Union Budget2021 : सेन्सेक्स तब्बल 2314 आणि निफ्टी 646 अंकांनी झेपावला  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आगामी आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. वित्तमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना, शेअर मार्केट 965 अंकांनी वधारला होता. त्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर सेन्सेक्सने आज 2314 अंकांनी झेप घेत 48,600 वर पोहचला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आगामी आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थसंकल्प सादर केला. वित्तमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत असताना, शेअर मार्केट 965 अंकांनी वधारला होता. त्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर सेन्सेक्सने आज 2314 अंकांनी झेप घेत 48,600 वर पोहचला आहे. तर निफ्टीने देखील वाढ नोंदवली असून, 646 ने वाढून 14,281 वर गेला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे संसदेतील अर्थसंकल्पाबाबतचे भाषण सुरु होताच सेन्सेक्स 596 अंकांनी उंचावला होता. याशिवाय आज एकाच दिवसात देशातील सर्वात जुना शेअर मार्केट मुंबई शेअर बाजार पाच टक्क्यांनी झेपावला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 4.74 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 

UnionBudget 2021 : संरक्षण क्षेत्रासाठी मागील 15 वर्षातील सर्वाधिक वाढ; वाचा...

अर्थसंकल्पाच्या दिवशी आज सकाळी शेअर बाजार तेजीनेच खुला झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 406 अंकांनी वाढून 46692 वर पोहोचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई 100 हून अधिक अंकांनी वाढून 13,700 वर खुला झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर दोन सरकारी बँकांमधील निर्गुंतवणूकीकरण, एलआयसीचा आयपीओ आणि बँकांच्या नव्या भांडवलाशी संबंधित अर्थसंकल्पीय घोषणांमुळे बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांचे शेअर चांगलेच वधारले. सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांच्या समभागांनी तेजी नोंदवली. निफ्टीत देखील 50 पैकी 45 कंपन्यांचे शेअर वाढले. 

बँकिंग क्षेत्रातील इंडसइंड बँक सर्वाधिक 14.75 टक्क्यांनी वधारला. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एसबीआय, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनीही तेजी नोंदविली. तर स्टील क्षेत्रातील काही समभाग, जेएसडब्ल्यू स्टील, सिमेंट, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल आणि एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागांनी घसरण नोंदवली. 

संबंधित बातम्या