नेटफ्लिक्स वर आपल्या पसंतीची भाषा अशी करा सेट

इंटरनेट ब्राउझर किंवा स्मार्टफोनवर अशी भाषा बदला
नेटफ्लिक्स वर आपल्या पसंतीची भाषा अशी करा सेट
Netflix Dainik Gomantak

देशात ओटीटी मार्केट झपाट्याने वाढत आहे. भारतात आता नेटफ्लिक्स , अ‍ॅमेझॉन प्राइम , एमएक्स प्लेयर, डिजनी प्लस हॉटस्टार, Zee 5 आणि इतर अनेक OTT प्लॅटफॉर्म आहेत. यापैकी नेटफ्लिक्सने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथे तुम्हाला विविध भाषांमधील चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शो पाहायला मिळतात. आता Netflix अ‍ॅप चालवण्याचा आणि अनेक भारतीय (Indian) भाषांमध्ये शो पाहण्याचा पर्याय देखील देते. येथे आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्समध्ये भाषा कशी बदलू शकता ते सांगू. (Netflix Latest News)

इंटरनेट ब्राउझर किंवा स्मार्टफोनवर अशी भाषा बदला

जर तुम्ही हे प्लॅटफॉर्म इंटरनेट ब्राउझर किंवा स्मार्टफोनमध्ये वापरत असाल, तर भाषा बदलण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

  1. तुमच्या Android मोबाइल फोनवर Netflix अ‍ॅप उघडा आणि प्रोफाइल विभागात जा.

  2. आता स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल आयकॉनमधून ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा.

  3. येथे तुम्हाला 'अकाउंट' हा पर्याय निवडावा लागेल.

  4. आता 'प्रोफाइल आणि पॅरेंटल कंट्रोल्स' विभागात, तुमच्या प्रोफाइलसाठी दिलेल्या भाषेच्या पर्यायांपैकी एक निवडा.

  5. भाषा निवडल्यानंतर खालील सेव्ह बटणावर क्लिक करा.

Netflix
पंतप्रधान मोदी 15 जानेवारीला स्टार्टअप्सशी साधणार संवाद

स्मार्ट टीव्हीवर अशी भाषा बदला

तुम्ही स्मार्ट टीव्हीवर नेटफ्लिक्स चालवत असाल तर या स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वप्रथम टीव्हीवर नेटफ्लिक्स अ‍ॅप लाँच करा. आता प्रोफाइल पेजवर तळापासून संपादन चिन्ह निवडा.

  2. आता तुम्हाला 'भाषा' पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि पुढे जा.

  3. येथे दिलेली कोणतीही एक भाषा निवडा आणि ती सेव्ह करा.

  4. आता तुमच्या अॅपची भाषा बदलेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com