रिस्क है तो इश्क है! फायदेशीर Portfolio तयार करण्यासाठी आपली जोखीम क्षमता तपासा

एक चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी, गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता जाणून घ्या
रिस्क है तो इश्क है! फायदेशीर Portfolio तयार करण्यासाठी आपली जोखीम क्षमता तपासा
Investment PortfolioDainik Gomantak

कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा उद्देश नफा मिळवणे हाच असतो. शेअर बाजारात अल्प आणि मध्यम कालावधीत तोटा होणे अगदी सामान्य आहे. तुमची जोखीम म्हणजे परताव्याची अनिश्चितता. गेल्या 10 वर्षांत, निफ्टी 50 ने गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा दिला आहे. परंतु, या 10 वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना 10 ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान सहन करावे लागले. (Investment Portfolio)

अशाप्रकारे, ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घेण्याची अधिक इच्छा होती, ते बाजारात टिकून राहिले आणि दीर्घकालीन फायदेशीर राहिले. एक चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी, गुंतवणूकदाराला त्याची जोखीम घेण्याची क्षमता जाणून घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्या जोखमीच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, जेणेकरून तो दीर्घकालीन गुंतवणूकीची उद्दिष्टे सहज साध्य करू शकेल.

Investment Portfolio
रशियन तेलाचा फायदा भारताला होणार; RBI ने वाढवली सरासरी किंमत

जोखीम मूल्यांकन खूप महत्वाचे आहे

moneycontrol.comच्या अहवालानुसार, व्यावसायिक पद्धतीने सर्वोत्तम गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी रिस्क असेसमेंट ही एक नवी युक्ती आहे. जोखीम मूल्यांकन गुंतवणूकदाराला त्याची जोखीम क्षमता सांगते.एखादी गुंतवणूक त्याच्यासाठी फायदेशीर आहे की तोट्याची आहे जे गुंतवणीकदाराला माहिती असणे खूप महत्वाचे आहे. जोखीम मूल्यांकनाद्वारे तयार केलेल्या पोर्टफोलिओचा फायदा असा आहे की गुंतवणूकदार अल्प-मुदतीच्या बाजारातील सुधारणांचा सहज सामना करू शकतो आणि दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी तयार करण्याचे त्याचे उद्दिष्ट सहज साध्य करू शकतो.

जोखीम मूल्यमापन कसे करावे

जोखीम मूल्यमापन ही आर्थिक सल्लागारांद्वारे जोखीम देणारा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी वापरली जाणारी तीन-चरणाची प्रक्रिया आहे. प्रथम, ती गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता ठरवते. यामध्ये गुंतवणूकदार कितपत धोका पत्करू शकतो हे ठरवले जाते. यानंतर, गुंतवणूकदाराचा गुंतवणुकीचा इतिहास पाहिला जातो आणि त्याने भूतकाळात घेतलेल्या जोखमीचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर आता सेट केलेल्या जोखीम क्षमतेशी याची तुलना केली जाते. त्यानंतरच, शेवटी, जास्त परतावा देणारा पोर्टफोलिओ निवडला जातो.

Investment Portfolio
पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून

जेव्हा बाजार घसरतो तेव्हा करा हे काम

जेव्हा अल्पावधीत किंवा मध्यम मुदतीत बाजार घसरतो तेव्हा गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांनी एफडीमध्ये पैसे ठेवले आहेत, ज्यामध्ये पैसे काढण्याची परवानगी नाही. इतकेच नाही तर कमी किमतीत तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले स्टॉक समाविष्ट करण्याची संधी म्हणून याकडे पाहिले पाहिजे. जर गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता खूप कमी असेल, तर त्याने लॉस बुक करावा आणि बाजार घसरल्यावर बाहेर पडावे. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान होण्यापासून टळेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com