बाजारात मंदी; सेंसेक्स निफ्टी मध्ये मोठी घसरण

सेन्सेक्स 736.18 अंकांनी म्हणजे 1.32 टक्क्यांनी घसरला आणि निर्देशांक 54966.05 च्या पातळीवर उघडला
बाजारात मंदी; सेंसेक्स निफ्टी मध्ये मोठी घसरण
Share market Dainik Gomantak

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी, शेअर बाजार जोरदार घसरणीसह उघडले. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आणि दोन्ही निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह उघडले. (Share market latest updates)

Share market
Kia EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर प्री-बुकिंग 26 मे पासून, किंमत आणि वैशिष्ट्ये घ्या जाणून

उघडण्याच्या वेळी, सेन्सेक्स 736.18 अंकांनी म्हणजे 1.32 टक्क्यांनी घसरला आणि निर्देशांक 54966.05 च्या पातळीवर उघडला. याशिवाय निफ्टी 50 मध्ये 231 अंकांची म्हणजेच 1.38 टक्क्यांची घसरण झाली आणि हा निर्देशांक 16451.70 च्या पातळीवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात 387 शेअर्समध्ये खरेदी तर 1643 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. याशिवाय 78 समभागांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Share market
Flipkart Sale : अनेक वस्तू 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

आशियाई बाजारही तोट्याने उघडले
आज सकाळपासून आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळच्या व्यवहारात सिंगापूरचा स्टॉक एक्स्चेंज 1.38 टक्क्यांनी घसरत आहे, तर जपानचा निक्केई 0.32 टक्क्यांनी घसरत आहे. हाँगकाँगचा शेअर बाजार 2.44 टक्के आणि तैवानचा 2.14 टक्क्यांनी घसरत आहे. याशिवाय दक्षिण कोरियाच्या स्टॉक एक्स्चेंज कॉस्पीमध्ये 1.42 टक्के आणि चीनच्या शांघाय कंपोझिटमध्ये 1.84 टक्क्यांची मोठी घसरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com