Share Marketचा ऐतिहासिक विक्रम, Sensex प्रथमच 58 हजारच्या पार

आज शेअर बाजाराने (Share Market) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने (Sensex) 58 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
Share Market on high Sensex reached on 58 thousand
Share Market on high Sensex reached on 58 thousand Dainik Gomantak

भारतीय शेअर बाजारात (Stock Market) सध्या सतत तेजी पाहायला मिळत आहे. आणि आज शेअर बाजाराने (Stock Market) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने (Sensex) 58 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी सुरूवातीच्या सत्रात सेन्सेक्स 217 अंकांनी वधारून 58,069 वर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 66.20 अंकांनी वाढून विक्रमी 17,300 वर पोहोचला आहे . कालही बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 514 अंकांनी वाढून नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला होता . NSE निफ्टी देखील 157.90 अंकांनी चढून 17,234.15 च्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला होता. (Share Market on high Sensex reached on 58 thousand)

काल, TCS चा शेअर सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये 3.34 इतका वाढला होता . याशिवाय, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज, नेस्ले इंडिया, कोटक बँक आणि टायटन हे शेअर्सदेखील वाढले होते.

दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक 2.29 टक्क्यांनी घसरला होता . जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे कंपनी उत्पादन 25 टक्क्यांनी कमी करेल असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे कंपनीचा शेअर खाली आला. इतर तोट्यांमध्ये बजाज ऑटो, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि एल अँड टी यांचा समावेश होता.

Share Market on high Sensex reached on 58 thousand
मुकेश अंबानींच्या Relianceची आता Just Dialवर मालकी

या वाढीबाबत बोलताना रिलायन्स सिक्युरिटीजचे स्ट्रॅटेजीचे प्रमुख विनोद मोदी यांनी बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने सर्वोच्च पातळी गाठल्याने देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आली असून आयटी, फार्मास्युटिकल्स आणि ग्राहक विभागातील शेअर्सनी बाजाराला आधार दिला आहे . तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वाहन वगळता, बहुतेक प्रमुख विभागनिहाय निर्देशांक नफ्यातच राहिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. मोदी म्हणाले की, ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन, रेल्वेकडून मालवाहतूक, वाहनांच्या विक्रीचे आकडे आणि अर्धवाहकांचा मुद्दा असूनही इंधनाची मागणी सतत आर्थिक पुनरुज्जीवन दर्शवते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com