देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या चौथ्या व्यवहारात तेजी नोंदवली आहे. देशातील सर्वात जुन्या शेअर बाजार मुंबई स्टॉक मार्केटच्या निर्देशांकाने आज 257.62 अशांची बढत घेत 51 हजाराची पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकाने 115.35 अंकांची बढत नोंदवत 15 हजाराचा टप्पा ओलांडला. त्यामुळे चालू आठवड्याच्या सलग तिसऱ्या व्यवहारात दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली आहे. कालच्या बुधवारी झालेल्या व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज 0.51 टक्क्यांनी वाढ नोंदवत 51,039.31 वर पोहचला. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी 0.77 अंकांची उसळी घेत 15,097.35 वर बंद झाला.
आठवड्याच्या चौथ्या सत्रव्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा बीएसई निर्देशांक आज सकाळी 51,207.61 वर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारचा एनएसई 15079.85 वर उघडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या संपूर्ण व्यवहारात सेन्सेक्सने 51,386.76 व निफ्टीने 15,176.50 पर्यंत वाढ नोंदवली होती. मात्र त्यानंतर पुन्हा अखेरच्या सत्रात दोन्ही निर्देशकांनी गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे घसरण नोंदवली. तर कालच्या तिसऱ्या सत्रात व्यापाराच्या वेळेस एनएसई मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यापाराची वेळ वाढविण्यात आली होती. आणि त्यानंतर दोन्ही निर्देशकांनी वाढीव वेळेत जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले होते.
मार्च महिन्यात या तारखांना बंद राहणार महाराष्ट्रातील बॅंका
कालच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स एकाच सत्रात 2.07 टक्क्यांनी वधारून 50 हजारच्या स्तर ओलांडत 50,781.69 वर पोहचला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सुद्धा तेजी नोंदवत 14,982.00 ची पातळी गाठली होती. निफ्टीमध्ये काल 1.86 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे कालच्या एकाच सत्रातील तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 2.6 लाख कोटींची भर पडली होती. याशिवाय, मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे भांडवली मूल्य वाढून 2,03,98,816.57 झाले.
मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, बजाज ऑटो, एचसीएल टेक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट आणि पॉवरग्रिड यांचे शेअर्स आज वधारले. तर मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, टायटन, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्सचे यांच्या समभागांनी घसरण नोंदवली.