Share Market Update : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहारात भांडवली बाजाराने नोंदवली किरकोळ घसरण

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्रव्यवहारात किरकोळ घसरण नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्रव्यवहारात किरकोळ घसरण नोंदवली आहे. तर आठवड्याच्या सलग दुसऱ्या व्यवहारात भांडवली बाजार घसरला असल्याचे पाहायला मिळाले. कालच्या व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 31.12 अंकांनी खाली येत 50,363.96 वर बंद झाला. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19.05 अशांनी घसरत 14,910.45 वर स्थिरावला. आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई कालच्यापेक्षा 213.34 अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 66.6 अशांनी झेपावत खुला झाला होता. मात्र शेवटच्या काही वेळेत दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

केंद्र सरकार दोन हजार रुपयांची नोट बंद करणार? जाणून घ्या खरं काय ते

काल सोमवारी पहिल्या सत्रात सेन्सेक्स 397.0 अशांनी खाली येत 50,395.08 बंद झाला होता. तर निफ्टी देखील 101.45 अंकांनी खाली येत 14,929.50 च्या पातळीवर बंद झाला होता. त्यानंतर आजच्या सत्रात झालेली घसरण मिळवून सेन्सेक्स 0.84 टक्क्यांनी व निफ्टी 0.80 टक्क्यांनी खाली आला आहे. तर आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 0.06 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदेशांक 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. आज दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 50,857.98 वर आणि निफ्टी 15,051.60 च्या पातळीवर पोहचला होता. 

आजच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, डॉक्टर रेड्डीज, इन्फोसिस, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एशियन पेंट, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड, आयटीसी, एचसीएल टेक, टीसीएस, टायटन, टेक महिंद्रा, एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग वधारले. तर बँक ऑफ बरोडा, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, लार्सन अँड टुब्रो, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, एसबीआय, सेंट्रल बँक, इंडसइंड बँक, एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग घसरले.    

  

संबंधित बातम्या