Share Market Update : भांडवली बाजरात चढ-उतार कायम; सेन्सेक्स आणि निफ्टीने नोंदवली तेजी  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

देशातील भांडवली बाजरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले चढ-उतार चालूच असल्याचे आजच्या व्यवहारात देखील पाहायला मिळाले.

देशातील भांडवली बाजरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले चढ-उतार चालूच असल्याचे आजच्या व्यवहारात देखील पाहायला मिळाले. काल आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी घसरण नोंदवली होती. तर आठवड्याच्या पहिल्या सत्रात म्हणजे मंगळवारी निर्देशकांनी तेजी नोंदवली होती. त्यानंतर हे चढ-उतार सुरूच असून आजच्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने मोठी झेप घेतली आहे. आणि त्यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील वाढला आहे. आजच्या व्यवहारात बीएसई 1.05 टक्क्यांनी व एनएसई 1.20 टक्क्यांनी वधारल्याचे पाहायला मिळाले.    

आजच्या सत्रव्यवहारात देशातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स कालच्या तुलनेत 520.68 अंशांनी वधारत 50,029.83 वर पोहचला. तर देशातील सर्वात मोठ्या शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176.65 अंकांनी वाढत 14,867.35 च्या स्तरावर बंद झाला. यापूर्वी कालच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 627.43 अंकांनी खाली येत 49,509.15 वर बंद झाला होता. आणि राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक 154.40 अंशांनी घसरत 14,690.70 च्या स्तरावर बंद झाला होता. तर त्याच्या अगोदर आठवड्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही निर्देशकांनी मोठी वाढ नोंदवली होती. 

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील एचसीएल टेक, रिलायन्स, इन्फोसिस,टेक महिंद्रा, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, बँक ऑफ बरोडा, एसबीआय, टायटन, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल बँक या कंपन्यांचे समभाग वधारले. तर एचडीएफसी बँक, टीसीएस या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. 

  

संबंधित बातम्या