आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार तेजीत,सेन्सेक्स 59200 वर

Share Market निफ्टी निर्देशांकात समाविष्ट असलेल्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स हे चांगला व्यापार करत आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार तेजीत,सेन्सेक्स 59200 वर
Share Market: Sensex cross 59200 points on MondayDainik Gomantak

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात (Share Market) लक्षणीय तेजी दिसून येत आहे. आज बाजारच्या सुरवातीलाच बीएसई (BSE) सेन्सेक्स (SENSEX) 494.24 अंकांच्या वाढीसह 59,259.82 अंकांवर व्यवहार करत होता. NSE निफ्टी देखील 127.40 अंक किंवा 0.73 टक्के वाढीसह 17,659.45 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी (Nifty) निर्देशांकात समाविष्ट असलेल्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स हे चांगला व्यापार करत आहेत. (Share Market: Sensex cross 59200 points on Monday)

Share Market: Sensex cross 59200 points on Monday
Amazon, Flipkart वर बंपर सेलचा धमाका, मिळवा बेस्ट डिल

NSE निफ्टी , डिव्हिस लॅब, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एम अँड एम आणि टाटा मोटर्सचे शेअर्स हे नफ्यात व्यापार करता आहेत.तर ग्रासिम इंडस्ट्रीज, यूपीएल, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स आणि आयओसीचे शेअर्स निफ्टीवर रेड मार्कांनी व्यवहार करत आहेत .

तर सेन्सेक्सचा विचार करता सेन्सेक्सवरील बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.14 टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय, बजाज फिनसर्व शेअर्समध्ये 2.14 टक्के, एम अँड एम शेअर्समध्ये 1.94 टक्के, एनटीपीसीमध्ये 1.82 टक्के आणि भारती एअरटेलमध्ये 1.67 टक्के वाढ दिसून अली आहे. तर टाटा स्टील, नेस्ले इंडिया, टायटन आणि पॉवरग्रिड सेन्सेक्सवर लाल मार्कांनी व्यवहार करत होते.तर बाजारात एफआयआयने 131.39 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

इतर आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास, हाँगकाँग आणि टोकियो खूप घसरणीसह व्यापार करत होते. दुसरीकडे, सोल आणि शांघायमधील शेअर बाजार सुट्टीमुळे बंद राहिले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com