Share Market : शेअर बाजाराचा सेन्सेक्स 400 अंकांनी गडगडला; निफ्टीची देखील घसरण    

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

आठवड्याची सुरवात मोठ्या तेजीत करणाऱ्या भांडवली बाजाराने आज घसरण नोंदवली आहे.

आठवड्याची सुरवात मोठ्या तेजीत करणाऱ्या भांडवली बाजाराने आज घसरण नोंदवली आहे. देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजार मुंबई शेअर मार्केटचा निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आज तब्बल 400.34 अंकांनी घसरून 51,703.83 वर बंद झाला आहे. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने देखील 104.55 अशांची घसरण नोंदवत 15,208.90 वर बंद झाला आहे. आठवड्यचा सुरवातीच्या पहिल्या सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. तर आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात म्हणजे काल बीएसईच्या सेन्सेक्स आणि एनएसईच्या निफ्टीने किरकोळ घसरण नोंदविली होती. मात्र आज तिसऱ्या सत्रात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

भांडवली बाजाराने आठवड्याच्या पहिल्या सत्रात सोमवारी ऐतिहासिक पातळी गाठत विक्रम नोंदवला होता. यावेळेस सेन्सेक्सने 52,114.13 आणि निफ्टी 15,314.70 या ऑल टाईम हायवर पोहचला होता. तर दुसऱ्या सत्रात मंगळवारी दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवली होती. काल सुरवातीला बाजार 500 च्या अंकाहून पुढे गेला होता. मात्र त्यानंतर अखेरीस यात घसरण दिसून आली होती. सेन्सेक्स कालच्या सत्रात 49.96 आणि निफ्टी 1.25 अशांनी खाली आला होता. परंतु आज गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे सेन्सेक्स तब्बल 400.34 अंकांनी आणि निफ्टी 104.55 अंकांनी खाली आला. 

आज शेअर बाजारातील वितेत्तर, स्टील, फार्मा सेक्टर आणि आयटी मधील कंपन्यांच्या समभागांनी घसरण नोंदविली. तर बँकिंग, केमिकल्स आणि टेकस्टाईल्स मधील कंपन्यांचे शेअर वधारल्याचे पाहायला मिळाले. इंडियन ओव्हरसीज, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचे समभाग तब्बल 20 टक्क्यांनी वधारले.          

संबंधित बातम्या