पेटीएम वापरकर्त्यांना झटका! क्रेडिट कार्डमधून पैसे ट्रान्सफर करणे महागले

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने पेटीएम देशभरातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून उदयास आला आहे.

नवी दिल्ली.  आपण किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी व विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलिंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी पेटीएम वॉलेट वापरतो. मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने पेटीएम देशभरातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून उदयास आला आहे. यामुळे क्रेडिट कार्डवरील पैसे पेटीएम वॉलेटमध्ये लोड करुन लोक छोटे-मोठे व्यवहार करत आहेत. जर आपण सामान्य व्यवहारासाठी पेटीएम वापरत असाल तर आपल्यासाठी ही वाईट बातमी आहे. कारण पेटीएम वापरणं हे पुन्हा महाग झालं आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे व्याजदर जैसे थे; महागाई दर घसरला

2.07 ते 4.07 टक्के अतिरिक्त शुल्क

paytmbank.com /रेट्स चार्जस वर दिलेल्या माहितीनुसार, आता जर एखादा ग्राहकाने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे ट्रान्सफर केले, तर त्याला अडीच टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. हे नियम 15 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. अमेरिकन एक्सप्रेसच्या क्रेडिट कार्डमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला 3 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. विशेष म्हणजे अनेक वापरकर्त्यांनी पेटीएम वॉलेटमधील क्रेडिट कार्डमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 2.07 टक्के शुल्क आकारल्याची तक्रार केली आहे. त्याच वेळी, बऱ्याच वापरकर्त्यांनी 4.07 टक्के शुल्क आकारत असल्याचे सांगितले आहे.

BSNL ने आणली सिनेमा प्लसची नविन ऑफर; मोजावे लागणार फक्त 129 रुपये  

15 ऑक्टोबरपासून 2% अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे

पूर्वी 15 ऑक्टोबर 2020 पासून जर एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करत असेल, तर त्याला 2 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागते. उदाहरणार्थ, जर आपण क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये ट्रान्सफर करत असाल तर आपल्याला आपल्या क्रेडिट कार्डसह 102 रुपये भरावे लागतील.

संबंधित बातम्या