‘रिलायन्स रिटेल’मध्ये ‘सिल्व्हर लेक’ची गुंतवणूक

पीटीआय
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलमध्ये ‘सिल्व्हर लेक’ कंपनी साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे ४.२१ लाख कोटी रुपये आहे.

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलमध्ये ‘सिल्व्हर लेक’ कंपनी साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या करारात रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मूल्य अंदाजे ४.२१ लाख कोटी रुपये आहे.

या व्यवहारानंतर रिलायन्स रिटेलचे १.७५ टक्के समभाग सिल्व्हर लेक कंपनीकडे असतील. सिल्व्हर लेक ही जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी गुंतवणूकदार कंपनी मानली जाते. रिलायन्स रिटेलमध्ये सिल्व्हर अलीकडेच रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुप ताब्यात घेतला आहे. 

सिल्व्हर लेकने यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्मवर १.३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १०२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नव्या व्यवहारामुळे रिलायन्स रिटेल आणि जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण मूल्यांकन ९ लाख कोटींच्या पुढे गेले आहे. देशभरात रिलायन्स रिटेलची  १२ हजाराहून अधिक स्टोअर आहेत.

सिल्व्हर लेकबरोबरील कराराबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “भारतीय रिटेल क्षेत्रातील ग्राहकांना मूल्याधारीत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी सिल्व्हर लेक महत्त्वपूर्ण भागीदार ठरेल.”

संबंधित बातम्या