गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर Jioचे ग्राहकांसाठी 'स्मार्ट गिफ्ट'

कंपनीकडून ग्राहकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यापैकीच एका पर्यायनुसार कंपनी जिओनेक्स्ट (Jio Next) फोनची विक्री केवळ 500 रुपयांत करणार आहे.
जिओ (JIO) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक स्मार्ट फोन (Smart phone) घेऊन येत आहे.
जिओ (JIO) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक स्मार्ट फोन (Smart phone) घेऊन येत आहे. Dainik Gomantak

मुंबई: जिओ (JIO) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक स्मार्ट फोन (Smart phone) घेऊन येत आहे. 10 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी जिओचा सर्वात स्वस्त स्मार्ट फोन बाजारात येईल. या फोनमध्ये इंटरनल असिस्टंट (Internal Assistant) असणार आहे.

जिओ (JIO) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक स्मार्ट फोन (Smart phone) घेऊन येत आहे.
Reliance AGM: स्वस्त दरातील JIO 5G फोनची होऊ शकते घोषणा

हा फोन गुगल बेस्ड (Google Based) असून, जिओफोन नेक्स्ट हा बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक किफायतशीर असेल. जिओनेक्स्ट फोन खरेदीसाठी कंपनीकडून एक विशिष्ट सेल्स स्ट्रक्चर (Sales Structure) तयार करण्यात आले असून, त्यानुसार कंपनीकडून ग्राहकांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यापैकीच एका पर्यायनुसार कंपनी जिओनेक्स्ट फोनची विक्री केवळ 500 रुपयांत करणार आहे.

या फोनची विक्री ईझी सेल्स मॉडेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येथे ग्राहकांना वन टाईम पेमेंटचा (One Time Payment) पर्याय देखील उपलब्ध आहे. परंतु, जास्तीत जास्त ग्राहकांनी हा फोन खरेदी करावा, हा जिओची प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीवेळी सुरुवातीला संपूर्ण पैसे देण्याची गरज राहणार नाही.

जिओ (JIO) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक स्मार्ट फोन (Smart phone) घेऊन येत आहे.
अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री

खरेदीकरिता ग्राहकांसाठी फोनची दोन मॉडेल आणली आहेत. यात बेसिक जिओफोन नेक्स्टची किंमत 5000 रुपये असेल, तर अॅडव्हान्स फोनची किंमत 7000 रुपये आहे. यापैकी कोणताही फोन खरेदी करताना ग्राहकाला फोनची पूर्ण किंमत द्यावी लागणार नाही. याचाच अर्थ ग्राहकाला यापैकी कोणताही फोन खरेदी करतेवेळी फोनच्या किंमतीच्या 10 टक्के म्हणजेच 500 रुपये किंवा 700 रुपयेच सुरुवातीला द्यावे लागतील. त्यानंतर फोनसाठीची उर्वरित रक्कम ग्राहकांना बॅंक किंवा लेंडिंग पार्टनरला द्यावी लागेल. म्हणजेच हा फोन ग्राहकाला हप्त्यावर घ्यावा लागणार हे स्पष्टच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com