SBIची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; घरबसल्या करा बँकिंगची कामे

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा भारतीय स्टेट बँक (SBI) पुरवित आहे. एसबीआय ग्राहक या सेवेमध्ये आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कम जाणून घेवू शकतात.

नवी दिल्ली : इंटरनेट बँकिंग पोर्टलद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा भारतीय स्टेट बँक (SBI) पुरवित आहे. एसबीआय ग्राहक या सेवेमध्ये आपल्या खात्यामधील शिल्लक रक्कम जाणून घेवू शकतात, रोक रक्कम हस्तांतरित करू शकतात, नवीन चेकबुकसाठी विनंती करू शकतात त्याचबरोबर डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. या सेवांव्यतिरीक्त ग्राहकांना एसबीआयमध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे मुदत ठेवी (Fixed Deposite) आणि आवर्ती ठेव खाते तयार करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी यूजरनेम आणि लॉग-इन पासवर्ड असणे गरजेचं आहे. 

घरबसल्या करा कामे- 
एसबीआयने आपल्या अदिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट केले आहे, जे ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. ग्राहक घरबसल्या इंटरनेट बँकिंगद्वारे आठ प्रकारची कामे करू शकतात. आर्थीक व्यवहार, एटीएम कार्डसाठी अर्ज, ठेवी (Deposite) खात्या संबंधित कामं, बिल पेमेंट, चेक बुकसाठी अर्ज करणे, युपीआय सुरू करणे आणि बंद करणे, व्याज भरणे.

सुरू करा इंटरनेट बँकिंग
याआधी खातेदारांना नेटबँकिंग सुविधेसाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यासाठी  फॉर्म भरणे, सुविधा सुरू करण्यासाठी प्रि-प्रिंट केलेल्या सूचना किटसाठी थांबणे अशा कटकटी पूर्वी ग्राहकांना कराव्या लागत होत्या. पण आता बँकेत फेऱ्या मारण्यापासून तुमची सुटका आता होणार आहे. ग्राहक आता घरी बसूनच एसबीआयच्या नेटबँकिंग सुविधेसाठी नोंदणी करू शकणार आहेत.  आणि हे काम पूर्णपणे ऑनलाइन करता येणे शक्य आहे. 

 • -सगळ्यात पहिले एसबीआयच्या नेट बँकिंग onlinesbi.com या होमपेजवर जा. 
 • -त्यानंतर New User Registration/Activation या ऑप्शनवर क्लिक करा.
 • या लिंक वर जावून खाते क्रमांक, सीआयएफ क्रमांक, शाखा क्रमांक, देश, नोंदणी केलेला अधिकृत मोबाइल क्रमांक, आपली आवश्यक माहिती भरा आणि Submit या बटणावर क्लिक करा.
 • -या सगळ्या प्रोसेसनंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. 
 • -आता याठिकाणी एटीएम कार्ड पर्याय निवडा आणि जर का तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर बँक पुढील प्रक्रिया पूर्ण करेल. 
 • -तात्पुरते यूजरनेम आणि पासवर्ड तयार करून घ्या. (पासवर्डमध्ये आठ शब्दांसह विशेष अंकाचा वापर करा). पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्या आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Submit बटणावर क्लिक करा.
 • -तात्पुरत्या क्रियेट केलेल्या यूजरनेम आणि पासवर्डने पुन्हा लॉग इन करा. 
 • आपल्या आवडीनुसार यूजरनेम तयार करा, जो तुम्हाला कायम आठवणीत राहील आणि वापरता येइल.
 • -अटी आणि नियम स्वीकारल्यानंतर लॉग-इन पासवर्ड आणि प्रोफाइल पासवर्ड सेट करून घ्या. आणि तेथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
 • -जन्मतारीख, जन्म स्थान आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तेथे अॅड करा.
 • बँक खात्याची माहिती जाणून घेण्यासाठी अकाउंट समरी या लिंकवर क्लिक करा.
 • -जर तुम्ही View only right नोंदणी केली असेल, तर तुमचा Transcation right अॅक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्या शाखेशी संपर्क साधू शकता.
 • आणि जर तुम्ही यूजरनेम व पासवर्ड विसरला असाल तर....
 • - www.onlinesbi.com या लिंकवर जा.
 • -फॉरगॉट लॉग-इन पासवर्ड यावर क्लिक करा. यानंतर पुढील पानावर जाण्यासाठी Next वर क्लिक करा.
 • -आता तुमचे युजरनेम, खाते क्रमांक, देश, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, जन्मतारीख सबमिट करा.
 • -तुमच्या मोबाईलवर पून्हा एक ओटीपी येईल. तो तेथे अॅड करा आणि कन्फर्म वर जावून क्लिक करा. 
 • -आता लॉग-इन पासवर्ड रिसेट करण्यासाठी तेथे 3 पर्याय दिसतील. एटीएम कार्ड एटीएम कार्ड तपशील आणि प्रोफाइल पासवर्ड.
 • -आता या प्रोफाइल पासवर्डशिवाय लॉग-इन पासवर्ड रिसेट करू शकात.
   

संबंधित बातम्या