Share Market Update : आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात भांडवली बाजाराने नोंदवली किरकोळ तेजी 
Share Market

Share Market Update : आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात भांडवली बाजाराने नोंदवली किरकोळ तेजी 

देशातील भांडवली बाजाराने आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात किरकोळ वाढ नोंदवली आहे. तर कालच्या आठवड्याच्या आणि महिन्याच्या पहिल्या सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी मोठी घसरण नोंदवली होती. त्यानंतर आजच्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर मार्केटचा बीएसई निर्देशांक कालच्या तुलनेत 281.81 अंशांनी वधारत 49,441.13 वर खुला झाल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई देखील 99.20 अंकांनी वाढत 14,737.00 च्या पातळीवर उघडला. (The stock market closed marginally higher in the second session of the week) 

आठवड्याच्या दुसऱ्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सक्स 42.07 अंशांच्या किरकोळ वाढीसह 49,201.39 च्या पातळीवर बंद झाला. यासोबतच देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील 45.70 अंकांनी वाढत 14,683.50 वर स्थिरावला. काल आठवड्याच्या पहिल्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 870.51 अंशांनी खाली येत 49,159.32 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 229.55 अंकांनी घसरत 14,637.80 च्या पातळीवर स्थिर झाला होता.

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील रिलायन्स, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय, टायटन, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा या कंपन्यांचे समभाग घसरले. तर, ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, कोटक महिंद्रा बँक, डॉक्टर रेड्डीज, बँक ऑफ बरोडा, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, सेंट्रल बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस या कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com