Share Market Update : सलग दुसऱ्या सत्रव्यवहारात शेअर मार्केट धडाम...  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या सत्रव्यवहारात आणि आठवड्याच्या चौथ्या व्यवहारात मोठी आपटी नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या सत्रव्यवहारात आणि आठवड्याच्या चौथ्या व्यवहारात मोठी आपटी नोंदवली आहे. देशातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल 740.19 अशांनी खाली येत 48,440.12 बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 224.50 अंकांनी घसरत 14,324.90 च्या पातळीवर स्थिरावला. चालू आठवड्याच्या दुसऱ्या सत्र व्यवहारात म्हणजेच मंगळवारी फक्त दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली होती. (The stock market fell for the second session in a row)

प्राप्तिकर विभागाला आधार क्रमांक न दिल्यास भरावा लागणार दंड

देशातील भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशांक काल आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात जोरदार घसरले होते. मुंबई शेअर (BSE/Sensex) बाजाराचा निर्देशांक काल तब्बल 871.13 अशांनी खाली येत 49,180.31 वर झाला होता. सेन्सेक्स सोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा (Nifty) निर्देशांक निफ्टी सुद्धा 265.35 अशांनी घसरत 14,549.40 वर स्थिरावला होता. त्यानंतर आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 1.51 टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 1.54 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. तर काल आणि आज मिळून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1611.32 अंकांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 489.85 अंकांनी घरंगळला आहे. 

देशभरातील कोरोनाच्या वाढत्या नव्या प्रकरणांमुळे भांडवली बाजारात (Share Market) चिंतेने पडझड झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील भांडवली बाजारांचा प्रभाव देखील देशातील दोन्ही निर्देशकांवर झाले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कालच्या पडझडीनंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल 3.27 लाख कोटी रुपयांनी कमी झाली होती. तर, कंपन्यांचे बाजार मूल्य 202.48 लाख कोटींवर येऊन ठेपले होते.     

या दोन दिवसात पुर्ण करा बॅंकेची कामे; पुढील 7 दिवस बॅंका राहणार बंद

दरम्यान, आज मुंबई शेअर बाजारातील  भारती एअरटेल, एचसीएल टेक, बँक ऑफ बरोडा, रिलायन्स, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, टीसीएस, मारुती सुझुकी, टायटन, टेक महिंद्रा, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक,ओएनजीसी, बजाज फायनान्स, एशियन पेंट, पॉवरग्रिड, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, बजाज ऑटो या कंपन्यांचे समभाग घसरले. तर डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांचे समभाग वधारल्याचे पाहायला मिळाले.          

संबंधित बातम्या