Share Market: पहिल्याच सत्रात शेअर बाजारात विक्रमी वाढ; सेन्सेक्स 'ऑल टाईम हाय'

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक बीएसईने आज नव्या उच्चांकाला गवसणी घातली.

देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक बीएसईने आज नव्या उच्चांकाला गवसणी घातली. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराने देखील आज तेजी नोंदवत रेकॉर्ड केला आहे. आज बीएसईचा सेन्सेक्स 609.83 अंकांची झेप घेत 52154.13 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 151.40 अंकांनी वाढून 15314.70 वर बंद झाला. त्यामुळे भांडवली बाजाराने सत्राच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केले. आज सकाळी भांडवली बाजार खुलताच बीएससीच्या सेन्सेक्सने 359.87 अंकांची वाढ घेत 51,904.17 पातळी गाठली होती. आणि निफ्टी सुद्धा 107 अंकांच्या वाढीसह 15,270.30 वर उघडला. 

देशातील भांडवली बाजाराच्या या ऐतिहासिक कामगिरीवर खासकरून बँकिंग क्षेत्राचे साहाय्य मिळाल्याचे आज पाहायला मिळाले. आज आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग चांगलेच वधारले. तर डॉक्टर रेड्डी, एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील आणि टीसीएस यांच्या समभागांनी घसरण नोंदवली. भांडवली बाजारातील मीडिया, आयटी, मेटल आणि फार्मा या कंपन्यांचे समभाग घसरले. आणि ऑटो, एफएमसीजी, बँका, फायनान्स सर्व्हिसेस, रिअल्टी, पीएसयू बँका आणि खासगी बँक यांचे शेअर मध्ये तेजी दिसून आली.  

शेतकऱ्यांना नको असलेले कायदे सरकार जबरदस्तीनं का थोपवतंय? प्रियांका गांधींचा...

बँकिंग क्षेत्रात जोरदार तेजी पाहायला मिळाली. ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर चांगलेच वधारले. याशिवाय एचडीएफसी, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, ओएनजीसी आणि भारती एअरटेल या बँकांच्या समभागांनी तेजी नोंदवली. तर, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, टायटन, टेक महिंद्रा, एशियन पेंट, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि डॉ. रेड्डी यांचे शेअर्स उतल्याचे पाहायला मिळाले. 

दरम्यान, बीएससीच्या सेन्सेक्सने आज नवा उच्चांक गाठताना आठवड्याच्या पहिल्याच सत्रात 1.18 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने देखील एका टक्क्यांची वाढ नोंदवली.  

संबंधित बातम्या