Share Market : सलग दुसऱ्या सत्रव्यवहारात शेअर बाजार वधारला; सेन्सेक्स 50 हजारावर, तर निफ्टी 15 हजारा नजीक     

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 2 मार्च 2021

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्रव्यवहारात देखील तेजी नोंदवली आहे.

देशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्रव्यवहारात देखील तेजी नोंदवली आहे. कालच्या आठवड्याच्या पहिल्या सत्र व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 447.05 अंकांनी वधारून 50 हजाराच्या वर पोहचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 157.55 अशांनी वाढून 15 हजाराच्या नजीक बंद झाला. आज सत्र व्यवहाराच्या सुरवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कालच्या तुलनेत 408.25 अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक 103.75 अशांनी वाढून खुला झाला होता. 

आज आठवड्याच्या दुसऱ्या सत्र व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 0.90 टक्क्यांनी वाढला. व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1.07 टक्क्यांनी वधारला. याशिवाय दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 50,439.82 अंकांवर आणि निफ्टी 14,959.10 पातळीवर पोहचला होता. मात्र त्यानंतर सत्राच्या अखेरीस यात घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर मार्केट आज दिवसभरात 447.05 अंकांनी वधारून 50,296.89 अशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 157.55 अंकांनी वाढून 14,919.10 अशांच्या स्तरावर पोहचला. 

बटाट्याचे उत्पन्न वाढूनही शेतकऱ्यांना बसणार फटका

दरम्यान, काल  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 749.85 अंशांनी वाढत 49,849.84 वर बंद झाला होता. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 232.40 अंकांची वाढ नोंदवत 14,761.55 चा स्तर गाठला होता. तर मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्र व्यवहारात दोन्ही निर्देशकांनी मोठी आपटी नोंदवली होती. फेब्रुवारी महिन्याच्या 26 तारखेला सेन्सेक्स तब्बल 1,939.32 अशांनी खाली येत 49,099.99 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 568.20 अंकांनी घसरत 14,529.15 या स्तरावर बंद झाला होता.      

आजच्या सत्रात ओएनजीसी, एसबीआय, डॉक्टर रेड्डीज, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बरोडा यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, बजाज ऑटो, एचसीएल टेक,  एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस,  एशियन पेंट, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, टायटन, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारले.                  

संबंधित बातम्या