शेअर बाजार पुन्हा जागतिक ट्रेंडनुसार सुरू; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी मध्ये 4 दिवसाच्या तुलनेत मोठी घसरण बघायला मिळाली.
Stock market Updates
Stock market UpdatesDainik Gomantak

Share Market Update: या आठवड्यात अर्थसंकल्पातून देशांतर्गत शेअर बाजाराला मिळालेला पाठिंबा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजार (Share Market) पुन्हा जागतिक ट्रेंडच्या इशाऱ्यानुसार सुरू झाला आहे. आज व्यवहार सुरू होताच BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी मध्ये 4 दिवसाच्या तुलनेत मोठी घसरण बघायला मिळाली.

बाजारात आधीच दबावाची चिन्हे दिसत होती. मार्केट सुरू होताच बीएसई सेन्सेक्स सुमारे 70 अंकांनी घसरला. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स 59,450 अंकांच्या खाली आणि 115 अंकांपेक्षा अधिक खाली व्यवहार करत होता. NSE निफ्टी 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह 17,750 अंकांच्या खाली आला होता.

Stock market Updates
...तर कर्जबुडव्या उद्योगपतींना भारतात का आणत नाही? सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावलं

काल बुधवारी व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स 695.76 अंकांच्या (1.18 टक्के) वाढीसह 59,558.33 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 203.15 अंकांनी (1.16 टक्के) वर चढून 17,780 अंकांवर बंद झाला. मंगळवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता होती. सेन्सेक्स 848.40 अंकांनी (1.46 टक्के) 58,862.57 अंकांवर तर निफ्टीच्या 237 अंकांच्या (1.37 टक्के) वाढीसह 1300 अंकांच्या आसपास चढ-उतार झाल्यानंतर 17,576.85 अंकांवर होता.

बुधवारी अमेरिकेचा बाजार वॉल स्ट्रीट सलग चौथ्या दिवशी तेजीत होता. मात्र, त्यानंतरही आज आशियाई बाजारात घसरण सुरू आहे. जपानमध्ये, पाच महिन्यांतील सर्वात तीव्र घसरणीमुळे सर्विस सेक्टर 1 टक्क्यांहून अधिक खाली आले आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाचा कोस्पी 1 टक्क्यांनी वर आहे. ज्याच्या बाह्य ट्रेंडचा परिणाम आज देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे.

Stock market Updates
पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये झाला मोठा बदल

आज अनेक मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या कंपन्यांमध्ये आयटीसी, टायटन, आदित्य बिर्ला कॅपिटल, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, गेल, कल्याण ज्वेलर्स या नावांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या निकालाचा बाजारावर दिवसभराच्या व्यवहारातही काही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com