कोरोनाचा असाही परिणाम; लॉकडाऊनमुळे उद्योगांत 46 हजार कोटींचे नुकसान 

कोरोनाचा असाही परिणाम; लॉकडाऊनमुळे उद्योगांत  46 हजार कोटींचे नुकसान 
lockdown.jpg

देशभरात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहेत. ज्यामुळे उद्योगांचे,  व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. देशातील बर्‍याच राज्यात गेल्या 10 दिवसात कोरोना कर्फ्यू आणि आंशिक लॉकडाऊनमुळे अंदाजे 46,000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी किरकोळ व्यवसायाचे सुमारे 32 हजार कोटींचे आणि घाऊक व्यवसायात सुमारे 14 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा व्यापार्‍यांची संघटना असोसिएशन ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) यांनी 1 एप्रिल रोजी दावा केला आहे. (Such is the effect of the corona; Lockdown costs industry Rs 46,000 crore)

कोरोनाच्या भीतीमुळे सुमारे 60 टक्के ग्राहकांनी बाजारपेठेपासून पाठ फिरवली आहे. याबाबत देशातील नऊ राज्यांच्या प्रमुख व्यावसायिक नेत्यांकडून गेल्या दहा दिवसांत झालेल्या   उद्योगांच्या नुकसानीची माहिती मिळवण्यात आली आहे, अशी माहिती  सीएआयटी'चे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया यांनी दिली आहे. 

कोणत्या राज्यात किती नुकसान?
- महाराष्ट्रात किरकोळ व्यापारात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि घाऊक व्यापारामध्ये हे नुकसान सुमारे 6000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- छत्तीसगडमध्ये किरकोळ व्यापारात 1200 कोटी आणि घाऊक व्यापारात सुमारे 600 कोटींचे नुकसान झाले आहे.
- गुजरातमध्ये किरकोळ व्यवसायाचे सुमारे 4800 कोटी आणि घाऊक व्यापाराचे सुमारे 2200 कोटींचे नुकसान झाले आहे.
- दिल्लीतील किरकोळ व्यवसायाचे सुमारे 3000 कोटी आणि घाऊक व्यापाराचे 1400 कोटींचे नुकसान झाले आहे.
- कर्नाटकमधील किरकोळ व्यापाराचे नुकसान सुमारे 4300 कोटी रुपये आहे, तर घाऊक व्यापाराचे नुकसान सुमारे 1950 कोटी रुपये आहे.
- पंजाबमध्ये किरकोळ व्यापारात सुमारे 900 कोटी रुपयांचे तर घाऊक व्यापाराचा तोटा 350 कोटी रुपये आहे.
- राजस्थानमध्ये किरकोळ व्यापारातील तोटा सुमारे 1900  कोटी आणि घाऊक व्यापारात 850 कोटींची तोटा आहे.
- मध्य प्रदेशात किरकोळ व्यापारातील तोटा सुमारे 1700 कोटी आणि घाऊक व्यापारात सुमारे 750 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
- उत्तर प्रदेशात किरकोळ व्यापाराचे नुकसान सुमारे 3800 कोटी असून घाऊक व्यापाराची तूट 1500 कोटी आहे.
 - रात्रीच्या कर्फ्यूचा घाऊक व्यापारावर परिणाम होतो.  


कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशभरात कोरोना प्रकरणात झपाट्याने होणारी वाढ आणि बर्‍याच राज्यांत रात्रीचे कर्फ्यू आणि आंशिक लॉकडाऊमुळे सामान्य ग्राहक घाबरून गेले आहेत. ते बाजारात जाणे टाळत आहेत. यामुळेच किरकोळ बाजारात तोटा होत आहे. त्याच वेळी घाऊक व्यापारामधील तोटा होण्याचे मूळ कारण म्हणजे वस्तूंचे लोडिंग एवं अनलोडिंग पूर्णत: ठप्प झाली आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये,  रात्रीच्या वेळी माल उतरवणे आणि चढवण्याची प्रक्रिया पार पडत असते. पण राज्यात रात्रीच्या वेळेतही संचार बंदी आहे. त्यामुळे मालाच्या लोडिंग आणि अनलोडिंगवर मोठा परिणाम झाला आहे. अशातच दिवसा ट्रकच्या प्रवेशावर बंदी आहे. तर रात्री 9 नंतरच शहरात ट्रकच्या प्रवेशास मान्यता देण्यात आल्याने  व्यापारात मोठे नुकसान झाले आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com