Suez Canal Blockage: सुएझ कालव्यामध्ये ( Suez Canal Blockage) अडकलेल्या व्यापारी जहाजचा परिणाम पश्चिम देशांमधील समुद्र मार्गाने होणाऱ्या व्यापारावर होत आहे. यामुळे भारताचे मोठे नुकसान होण्याची तसेच गंभीर उत्पादन पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. या संकटामुळे शिपिंग दर वाढल्याने वाहतूक खर्चही वाढण्याची शक्यता आहे. 400 मीटर लांबीचे एव्हर ग्रीन कंटेनर जहाज सुएझ कालव्यात अडकले आहे आणि त्यामुळे कालव्यात मोठा जाम झाला आहे. व्यापारी जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. या संकटामुळे दोन्ही बाजूंनी समुद्री वाहतूक ठप्प झाली आहे. शेकडो जहाज आणि तेलाचे टॅंकर अडकले आहेत.
या संकटामुळे तेल, वस्त्रोद्योग, फर्निचर, कापूस, ऑटो घटक आणि मशिन भागांचे युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या देशांमधून येण्यास 10 ते 15 दिवस उशीर होऊ शकतो. त्याचप्रमाणे भारतत तेल, स्टीलच्या वस्तू, भंगार व मशिनचे भाग, फिनॉल व अनिलीन सारख्या मूलभूत रसायनांच्या आयातीत विलंब होवू शकतो. निर्यात-आयात ऑटोमेशन प्लॅटफॉर्म शिपसीच्या मते, या अडथळ्यामुळे मालवाहतुक भाडयामध्ये 5 ते 15 टक्क्यांची वाढ होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपताच बांगलादेश मधील हिंदूं मंदिरांवर हल्ले झाले आहेत
युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेसह सुएझ कालव्याद्वारे भारताचा वार्षिक व्यापार 200 अब्ज डॉलर्सचा आहे. मंगळवारपासून १९३ किमी लांबीच्या सुएझ कालव्यामध्ये 160 जहाजे अडकली आहेत. सुएझ कालवा भूमध्य सागर आणि लाल समुद्राला जोडतो आणि दररोज सरासरी 50 जहाजे त्यामधून वाहतूक करतात.
जागतिक व्यापारामध्ये 12% भागभांडवल
निर्यातदारांचे म्हणणे आहे की एशिया आणि युरोप दरम्यान तेल आणि ग्राहकांच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी सुएझ कालवा जगातील सर्वात व्यस्त मार्ग आहे. जग आधीच कंटेनरच्या कमतरतेच्या अडचणीशी झगडत आहे आणि या संकटाच्या प्रदीर्घ काळामुळे फ्रेट दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर सुवेझ कालव्यातील अडकलेल्या जहाज लवकर निघाले नाही तर जहाजांना केप ऑफ गुड होपमधून जावे लागेल.
मर्चंट नेव्हीच्या एका माजी कॅप्टनने सांगितले की यामुळे जहाजांना 7 ते 8 दिवस अधिक प्रवास करावा लागणार आहे. युरोप ऑर्डर थांबवू शकेल. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे(FIEO) महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सहाय म्हणाले की, सुएझ कालव्यातील अडथळा 7 ते 10 दिवसात दुर केला जाऊ शकतो परंतु पुर्वस्थितीत येण्यासाठी कमित कमी 2 आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
वर्णद्वेषामुळे होणाऱ्या गुन्ह्यांविरूद्ध शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये हजारो लोकांनी निदर्शने सुरु केली आहेत
कोलकातास्थित अभियांत्रिकी कंपनी कार्नेशन इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी रवी सहगल म्हणाले की, युरोपसाठी अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात महाग होऊ शकते. पुढे बोलतांना सहगल म्हणाले की, मार्च-एप्रिलमध्ये युरोपमधील मागणी वाढते आणि आता अशा परिस्थितीत तेथून ऑर्डर थांबवले जावू शकते. तसेच, असेंब्ली लाइनमध्ये वापरल्या जाणार्या स्टीलच्या वस्तू आणि मशीन पार्ट्सची आयात करण्यास विलंब होऊ शकतो. भारत आफ्रिका, अमेरिका आणि युरोपमधून भंगार आयात करतो. एप्रिल ते जानेवारी 2020-21 दरम्यान भारताने एकूण 6.5 अब्ज डॉलर्स किंमतीची लोखंड व पोलाद आयात केले आहे.
ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! गाण्यातून अमेरिका-भारताचे संबंध मजबूत
भारत दररोज सुमारे 500,000 बॅरल कच्च्या उत्पादनांची आयात सुएझ कालव्याद्वारे करतो, त्यानंतर चीन दररोज 400,000 बॅरलपेक्षा जास्त आयात करतो आणि दक्षिण कोरिया आणि सिंगापूर दररोज सुएझ कालव्यापासून 400,000 बॅरलपेक्षा कमी आयात करतो. व्होर्टेक्साला. रिपोर्टनुसार, डिसेंबर 2020 मध्ये भारताने सुमारे 5 दशलक्ष बॅरल खनिज तेलाची आयात केली.
सुएझ कालव्याद्वारे क्रूड उत्पादनांच्या निर्यातीत भारत दररोज 200,000 बॅरलपेक्षा कमी निर्यात करतो. रशिया, सौदी अरेबिया, इराक, लिबिया आणि अल्जेरियाच्या तुलनेत सहाव्या क्रमांकावर आहे.