अवमान प्रकरण: विजय मल्ल्याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालय देणार 11 जुलैला निर्णय

न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी फरार उद्योगपती विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे.
Vijay Mallya
Vijay MallyaDainik Gomantak

Contempt Of Court: न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी फरार उद्योगपती विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे. रवींद्र एस भट आणि पीएस नरसिम्हा यांचा समावेश असलेले न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सोमवारी निकाल देणार आहे. खंडपीठाने 10 मार्च रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये दोषी ठरवले होते.

दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, 'मल्ल्या युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) मुक्तपणे आयुष्य व्यतीत करत आहे. त्यांच्याशी संबंधित कारवाईबाबत कोणतीही माहिती समोर येत नाहीये. शिक्षा राखून ठेवण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, आम्हाला सांगण्यात आले आहे की (मल्ल्याविरुद्ध) यूकेमध्ये काही खटले सुरु आहेत. किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याची आम्हाला माहिती नाही.'

Vijay Mallya
विजय मल्ल्या, नीरव मोदी अन् मेहुल चोक्सी यांची 19,111 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

'मी बाजू घेण्यास असहाय्य आहे'

त्याचवेळी, सुनावणीदरम्यान, मल्ल्याच्या वकिलाने सांगितले की, 'ब्रिटनमध्ये राहणाऱ्या माझ्या अशिलाकडून कोणतीही सूचना मिळू शकलेली नाही, त्यामुळे अवमान प्रकरणात ठोठावल्या जाणाऱ्या शिक्षेच्या कालावधीबाबत आपली बाजू मांडण्यास मी असहाय आहे.' तत्पूर्वी, न्यायालयाने मल्ल्याला दिलेल्या प्रदीर्घ कालावधीचा हवाला देत सुनावणीसाठी 10 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. न्यायालयाने (Court) वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहण्याची शेवटची संधी दिली होती.

Vijay Mallya
विजय मल्ल्या, नीरव मोदी अन् मेहुल चोक्सीने बॅंकाचे 18,000 कोटी केले परत !

2017 मध्ये न्यायालयाने दोषी ठरवले

मल्ल्याला 2017 मध्ये अवमानाप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण त्यांच्या प्रस्तावित शिक्षा निश्चित करण्यासाठी सूचीबद्ध केले जाणार होते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2020 मध्ये मल्ल्या यांनी 2017 च्या निकालाच्या पुनर्विलोकनासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल मल्ल्या यांना दोषी ठरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com