Swiggy POSH Policy: महिला डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी स्विगीचा मोठा निर्णय, लैंगिक छळापासून मिळणार संरक्षण

या निर्णयामुळे महिलांना डिलिव्हरी क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
Swiggy POSH Policy
Swiggy POSH PolicyDainik Gomantak

Swiggy POSH Policy: भारतात फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्विगी कंपनीने महिला डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना काम करताना अधिक संरक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, या निर्णयामुळे महिलांना डिलिव्हरी क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. असे फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने (Swiggy) म्हटले आहे.

Swiggy POSH Policy
Team India Viral Video: टीम इंडियाचा स्वॅग, न्यूझीलंडच्या बीचवरील खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल

काय आहे स्विगीचा निर्णय

देशात लैंगिक छळाच्या अनेक घटना घडत असतात. अशात महिला डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी स्विगीने लैंगिक छळ प्रतिबंधक धोरण लागू केले आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाच्या जोखमीपासून संरक्षण मिळणार आहे. प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरॅसमेंट (POSH) कायद्याशी सुसंगत स्विगीचे हे धोरण आहे. महिला डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा ग्राहक, पुरुष सहकारी, रेस्टॉरंट भागीदार आणि स्विगी कर्मचार्‍यांकडून लैंगिक छळ झाल्यास, कोणतीही महिला डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह मदतीसाठी स्विगीच्या आपत्कालीन SOS क्रमांकावर संपर्क साधू शकते.

Swiggy POSH Policy
Osargaon Toll Issue: अन्यथा ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही, राष्ट्रवादी आक्रमक

पुरुष असो किंवा महिला स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हची सुरक्षा, आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह अॅपमध्ये एक SOS बटण आहे जे एक्झिक्युटिव्हना त्वरित रुग्णवाहिका, स्थानिक पोलिस स्टेशन किंवा स्विगी हेल्पलाइनशी जोडू शकते, तसेच, हा चोवीस तास सपोर्ट मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com