Swiggy Layoffs: स्विगीमध्ये काम करणाऱ्यांना मोठा झटका, लवकरच मिळणार नारळ!

Amazon, ट्विटर, गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी देखील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे.
Swiggy
SwiggyDainik Gomantak

Swiggy Layoffs: जागतिक मंदीच्या भीतीने अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. Amazon, ट्विटर, गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी देखील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. स्विगीने सांगितले की, आम्ही 10 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकू शकतो.

अनेक सेवा प्रभावित होऊ शकतात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्विगीमधील आगामी टाळेबंदीमुळे कंपनीच्या उत्पादन, अभियांत्रिकी आणि ऑपरेशन्स सारख्या वर्टिकलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रोख बर्न कमी करण्यासाठी आगामी टाळेबंदीचा स्विगीच्या वाणिज्य वितरण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Swiggy
Swiggy: 'मुस्लिम डिलीवरी बॉय नको' ग्राहकांच्या डिमांडवर मोईत्रांचा संताप

250 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले

कंपनीने आगामी टाळेबंदीवर मीडियाच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला नाही. यापूर्वी, डिसेंबरमध्ये समोर आलेल्या वृत्तांत असे म्हटले होते. स्विगी जानेवारीपासून 250 पेक्षा जास्त कर्मचारी किंवा 5 टक्क्यांपर्यंत कर्मचारी काढून टाकू शकते.

टाळेबंदीची संख्या वाढू शकते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाटणी केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. कंपनीत सुमारे सहा हजार कर्मचारी (Employees) कार्यरत आहेत.

Swiggy
भारतात Zomato अन् Swiggy झाले Down

कंपनीचा तोटा दुपटीने वाढला

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा तोटा मागील आर्थिक वर्षातील रु. 1,617 कोटींच्या तुलनेत FY22 मध्ये दुप्पट वाढून 3,629 कोटी रुपये झाला. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या वार्षिक आर्थिक विवरणानुसार, FY22 मध्ये एकूण खर्च 131 टक्क्यांनी वाढून 9,574.5 कोटी रुपये झाला आहे.

Swiggy
Zomato ला टक्कर देण्यासाठी Swiggy देखील आयपीओ आणण्याच्या तयारीत

महसूल 2.2 पट वाढला

स्विगीचा महसूल FY22 मध्ये 2.2 पटीने वाढून 5,705 कोटी रुपये झाला, जो FY21 मध्ये 2,547 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने म्हटले होते की, मोठ्या सवलती देऊनही स्विगीने प्रतिस्पर्धी झोमॅटोचा (Zomato) बाजारातील हिस्सा गमावला आहे. यापूर्वी 2022 मध्ये, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने $70.7 अब्ज डॉलर्सच्या मुल्यांकनाने इन्वेस्कोच्या नेतृत्वात $70 दशलक्ष जमा केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com