निवडणुकांच्या घोषणेआधी तमीळनाडू सरकारची 'गोल्डन भेट'

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संबंधित राज्यात आचारसंहिता लागू होईल. सहकारी बँकांकडून शेतकरी व गरीबांना देण्यात आलेल्या 6 प्रवर्गात घेतलेली सोन्याची कर्जे माफ केली जातील, अशी घोषणा राज्य सरकारने केली.

चेन्नई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्या काही तास आधी सोन्याचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संबंधित राज्यात आचारसंहिता लागू होईल. सहकारी बँकांकडून शेतकरी व गरीबांना देण्यात आलेल्या 6 प्रवर्गात घेतलेली सोन्याची कर्जे माफ केली जातील, अशी घोषणा राज्य सरकारने केली.

Share Market : भांडवली बाजार कोसळला; सेन्सेक्स तब्बल 3.80 व निफ्टी 3.76...

या निर्णयाचे औचित्य साधत मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले की कोविड या महामारीतून अद्याप अर्थव्यवस्था वर आलेली नाही आणि यामुळे गरिबांना लॉकडाऊन दरम्यान गहाण ठेवलेले सोने सोडविण्यास मदत होईल. तमिळनाडू राज्य एपेक्स सहकारी बँकेने कोविड दरम्यान मदत उपायांतर्गत कमी व्याजदरासह सुवर्ण कर्ज योजना ऑफर केल्या होत्या. या योजनांचा दरवर्षी हा व्याज दर 6 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

...या प्रश्नाचं उत्त देतांना अर्थमंत्र्यांवर ओढावलं धर्मसंकट

या योजनेंतर्गत तामिळनाडूतील लोकांना 25 हजार ते एक लाख रुपये मिळू शकते मात्र ही रक्कम तीन महिन्यांत परत करावी लागणार आहे. यापूर्वी, मुख्यमंत्र्यांनी 16 लाखाहून अधिक शेतकर्‍यांना दिलेले 12,000 कोटींचे कृषी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. राज्य विधानसभेत, ई. पलानीस्वामी यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर करणे हे त्यांचे पहिले कर्तव्य आहे.

संबंधित बातम्या