Tata Group: टाटा समूह करणार हे मोठं काम, लाखो लोकांवर होणार परिणाम

Tata Group News: टाटा समूह लवकरच एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
Ratan Tata
Ratan TataDainik Gomantak

Tata Group Latest News: टाटा समूह लवकरच एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, कंपनीने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यावरुन असा अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनी लवकरच एक मोठा बदल करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा ग्रुप आपल्या लिस्टेड कंपन्यांची संख्या कमी करु शकते.

कंपन्यांची संख्या 15 असू शकते

येत्या काही दिवसांत कंपनी सूचीबद्ध कंपन्यांची संख्या 29 वरुन 15 पर्यंत कमी करु शकते. कंपनीने याबाबत अनेक योजना आखल्या आहेत, सध्या या प्रकरणाबाबत टाटा समूहाकडून (Tata Group) कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

Ratan Tata
TATA GROUP: टाटा समूहाची ही कंपनी शेअर्स विभाजित करणार

टाटा समूहाच्या महसुलाबद्दल...

टाटा समूहाच्या महसुलाबद्दल बोलायचे झाल्यास, यावेळी तो सुमारे $128 अब्ज आहे. त्याच वेळी, कंपनीचे मार्केट कॅप $ 255 अब्ज झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी सध्या ग्रुपमध्ये समन्वय साधण्याचे काम करत आहे. सध्या बाजारात टाटा समूहाच्या 29 सूचीबद्ध कंपन्या आहेत.

किती असूचीबद्ध कंपन्या आहेत?

जर सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांबद्दल बोलयचे झाल्यास, त्या सुमारे 5 डझन आहेत, ज्या अद्याप सूचीबद्ध झालेल्या नाहीत. त्याच वेळी, जवळपास 100 सहाय्यक कंपन्या देखील सामील आहेत, ज्या समूहीबरोबर काम करत आहेत.

Ratan Tata
Tata Tiago EV: सप्टेंबर महिन्यातच येणार टाटा टियागो इलेक्ट्रिक कार; किती आहे किंमत

2017 पासून विलीनीकरणाचे काम सुरु

गेल्या आठवड्यात कंपनीने टाटा समूहाचा सर्व स्टील व्यवसाय टाटा स्टीलमध्ये (Tata Steel) विलीन केला आहे. त्याच वेळी, टाटा कॉफी कंपन्या ग्राहक उत्पादनांमध्ये विलीन झाल्या आहेत. कंपनी 2017 पासून कंपन्यांच्या विलीनीकरणावर काम करत आहे. 2017 मध्ये, CMC टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विलीन करण्यात आले. त्याच वेळी, 2018 मध्ये, कंपनीने आपले सर्व एरोस्पेस आणि संरक्षण व्यवसाय टाटा एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये विलीन केले. कंपनी आगामी काळात टाटाच्या इतर अनेक प्रकल्पांचे विलीनीकरण देखील करु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com