भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सने लॉन्च केला स्मार्ट ट्र्क; चालकाला होणार असा काही फायदा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

टाटा मोटर्सने आपला अल्ट्रा स्लीक टी-सिरिज स्मार्ट ट्रक भारतीय बाजारात आणला आहे. हा हलका व्यावसायिक तसेच मध्यम ट्रक आहे आणि शहरी वाहतुकीच्या गरजा भागवणारा आहे.

नवी दिल्ली: टाटा मोटर्सने आपला अल्ट्रा स्लीक टी-सिरिज स्मार्ट ट्रक भारतीय बाजारात आणला आहे. हा हलका व्यावसायिक तसेच मध्यम ट्रक आहे आणि शहरी वाहतुकीच्या गरजा भागवणारा आहे. यात आपल्याला तीन मॉडेल्स आढळतील ज्यात टी .6, टी .7 आणि टी .9 असा समावेश करण्यात आला आहे. या ट्रकच्या डेकची लांबी 10 ते 20 फूट आहे आणि टाटा मोटर्स म्हणतात की त्यांचा उपयोग बर्‍याच वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी करता येणार आहे.

या ट्रकचे केबिन 1900 मिमी युनिट आहे आणि टाटाचा असा दावा आहे की यामुळे ड्रायव्हरला आरामदायक ड्रायव्हींग करता येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, या केबिन आरामदायी सीटच्या सहाय्याने चालकाला ट्रक चालविण्याचा कंटाळा वाटणार नाही. ट्रकमध्ये टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हीलसुद्धा आहे. ड्रायव्हरच्या सोयीसाठी हाईट एडजस्टेबल सीट देखील देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यामध्ये यूएसबी फास्ट चार्जिंग, म्युझिक सिस्टम आणि मल्टिपल स्टोरेज क्षेत्रे देण्यात आली आहेत.

वैशिष्ट्ये

या ट्र्कमध्ये क्लियर लेंड हेडलाइट्स, LED टेललैम्प्स और पैरबोलिक लीफ सस्पेंशन देण्यात आले आहे. टाटा मोटर्समध्ये 4 आणि 6 टायरचे संयोजन देण्यात आले आहे. या टायर्सच्या मदतीने ट्रक उत्तम मायलेज देईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. इंजिन 4 एचपीसीआर वर 100 एचपीची पावर आणि 300 एनएमची टॉर्क देतो. टाटा मोटर्सने म्हटले आहे की, या ट्रकचा मेंटेनेंस कॉस्ट खूप कमी आहे. यामध्ये तुम्हाला 3 किंवा 3 लाख किलोमीटरची वॉरंटी मिळेल. या वाहनात टाटा तुम्हाला फ्लेडेड एज कनेक्टेड व्हीइकल टेक्नॉलॉजी देखील देणार. म्हणजेच ट्रकचा मालक याला स्मार्टफोन किंवा संगणकावरून देखील ऑपरेट करू शकणार आहे.

याशिवाय Tata Motors Sampoorna Seva 2.0 आणि Tata Samarth देखील देणार आहे. कंपनीच्या ऑन-साइट सेवा, व्यावसायिक चालक कल्याण, अपटाइम हमी आणि प्रत्येक आय आणि एलसीव्ही ट्रकसहित वार्षिक देखभाल आणि फ्लीट मॅनेजमेन्ट सोल्यूशन्सचे आश्वासन देण्याचे हे मार्ग आहेत.

 

संबंधित बातम्या