ई-कॉमर्स: टाटा गृप बिगबास्केटमध्ये 64.3% भागभांडवल खरेदी करणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

ई-कॉमर्स क्षेत्रात मजबूत अस्तित्व निर्माण करण्यासाठी, टाटा सन्स सध्या चायनीज ई-कॉमर्स जायंट अलिबाबा कंपनीचे पाठबळ असलेल्या ग्रोसरी कंपनी बिगबास्केटमध्ये बहुतांश प्रमाणात स्ट़ॉक खरेदी करणार आहे.

नवी दिल्ली: ई-कॉमर्स क्षेत्रात मजबूत अस्तित्व निर्माण करण्यासाठी, टाटा सन्स सध्या चायनीज ई-कॉमर्स जायंट अलिबाबा कंपनीचे पाठबळ असलेल्या ग्रोसरी कंपनी बिगबास्केटमध्ये बहुतांश प्रमाणात स्ट़ॉक खरेदी करणार आहे. टाटा सन्सची सहाय्यक कंपनी टाटा डिजिटल लिमिटेड यांनी भारतीय स्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) कागदपत्रे सादर केले आहे. या दस्तऐवजानुसार टाटा डिजिटल बिगबास्केटमध्ये 64.3% भागभांडवल खरेदी करणार आहे.

जर हा करार मंजूर झाला तर मिठापासून ते लक्झरी मोटारी पर्यंत आणि सॉफ्टवेअरपर्यंतचे सर्व काही टाटा गृप बनवून, अ‍ॅमेझॉन, वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट आणि रिलायन्स रिटेल या ई-कॉमर्स कंपनीला जोरदार टक्कर देणार आहे. पूर्वीच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की अलिबाबा समूहासह बिगबास्केटमधील 60% हिस्सा खरेदी करण्यासाठी कंपनी चर्चेत आहे. देशात कोविड -19 ची प्रसार होत असतांना हि कंपनी   ई-कॉमर्स विक्री मध्ये एंट्री मारत आहे, विशेषत: कोरोना काळात फूड आणि किराणा सामानाची प्रचंड वाढ झाली आहे, अशा वेळी टाटा गृप या विभागात प्रवेश करत आहे.

बिगबास्केटच्या प्रतिस्पर्धी कंपन्या त्यांच्या ई-किराणा व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत. फ्लिपकार्टने घोषित केले आहे की तो आपला विस्तार टियर 3 आणि टियर 4 शहरांपर्यंत वाढवित आहे. त्याचबरोबर रिलायन्स देखील आपल्या किराणा व्यवसायाला पाठिंबा देणार आहे. कंपनीने फेसबुक आणि गुगलकडून 20 अब्ज डॉलर्स जमा केले आहेत.

दररोज 3 लाख ऑर्डर बुक केली जातात

टाटा ग्रुप लवकरच आपले सुपर अ‍ॅप बाजारात आणणार आहे. अशा परिस्थितीत त्याला बिगबास्केट आणि किराणा उत्पादनांच्या घरातील मोठ्या वस्तूंकडून चांगला आधार मिळू शकेल. बिगबास्केटवर दररोज सुमारे 3 लाख ऑर्डर बुक होत आहेत. बिगबास्केट 18 हजारांहून अधिक उत्पादने विकतो. अलीकडेच त्याचे एकूण व्यापार मूल्य एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. लॉकडाउनपूर्वी फळे आणि भाज्यांची विक्री 16 ते 18% होती, जी आता 20 वरून 22% झाली आहे. टाटा समूहाला डिजिटल बाजारात आपली उपस्थिती वाढवायची आहे. यासाठी स्नॅपडील आणि इंडिया मार्टमध्येही भागीदारी खरेदी करण्याची योजना आहे.

 

संबंधित बातम्या