Tata Motors: टाटा टियागो XT Rhythm बाजारात; किंमत, फिचर्स जाणून घ्या

Tata Motors: टाटा टियागो XT Rhythm बाजारात; किंमत, फिचर्स जाणून घ्या

टाटा मोटर्स नवे नवे मॉडेल्स बाजारात घेऊन येत आहे आणि त्याला ग्राहक मोठ्या प्रमाणावर पंसती देखील देत आहेत. टियागो देखील टाटाचे असेच एक मॉडेल असून, टियागोचे नवे XT Rhythm नुकतेच बाजारात आले आहे. या नव्या व्हेरिएंटचा आकर्षक लूक, फिचर्स ग्रहाकांना आकर्षित करत आहे. टियागोचे Tata Tiago XT आणि Tata Tiago XZ+ असे दोन पर्याय बाजारात आहेत. नवे Tata Tiago XT Rhythm हे दोन्ही व्हेरिएंटनंतरचा नवा पर्याय आहे.

नवे अपडेटेड फीचर्स

XT Rhythm मध्ये अनेक अपडेटेड आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. कारला Apple CarPlay सह Android Auto कनेक्टिव्हिटीसह सात इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे. सह प्रवाशांसाठी कारमध्ये चार स्पीकर वापरण्यात आले आहेत.

कारमध्ये इमेज आणि व्हिडिओ प्लेबॅकसह व्हॉईस कमांड सपोर्ट सिस्टीमही देण्यात आली आहे. कारला स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फॉग लॅम्प्स आहेत. पार्किंगसाठी कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा बसवण्यात आला आहे.

Tata Motors: टाटा टियागो XT Rhythm बाजारात; किंमत, फिचर्स जाणून घ्या
Pramod Sawant: गोव्याचा सांस्कृतिक इतिहास शालेय अभ्यासक्रमात

पॉवरफुल इंजिन

XT Rhythm च्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कारला 1.2 लीटर BS6 स्टँडर्ड रेवोट्रॉन इंजिन आहे, जे 85bhp च्या मजबूत पॉवरसह 113Nm टॉर्क जनरेट करते. कारला 5 स्पीड मॅन्युअल गिअर दिले गेले आहेत, ज्यामध्ये ऑटोमॅटिक सुविधेचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

आकर्षक किंमत

टाटा टियागो XT Rhythm, XT आणि टॉप व्हेरिएंट XZ+ पेक्षा 30 हजार रुपये महाग आहे. Tata Tiago XT Rhythm Price ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Tata Tiago च्या बेस मॉडेलची किंमत (Tata Tiago Base Model Price) 6.18 लाख रुपये आहे.

Tata Motors: टाटा टियागो XT Rhythm बाजारात; किंमत, फिचर्स जाणून घ्या
Goa Accident : वेर्णा महामार्गावर मोठा अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com