'सेम टू सेम', टाटाच्या कारमध्ये टेस्लासारखे फिचर्स, ड्रायव्हरशिवाय चालणार कार
Tata AvinyaDainik Gomantak

'सेम टू सेम', टाटाच्या कारमध्ये टेस्लासारखे फिचर्स, ड्रायव्हरशिवाय चालणार कार

टाटा (Tata) मोटर्स ही देशातील ईव्ही उद्योगातील आघाडीची कंपनी आहे.

टाटा मोटर्स ही देशातील ईव्ही उद्योगातील आघाडीची कंपनी आहे. दुसरीकडे, एलन मस्क यांच्या टेस्लाला भारतात येण्यासाठी अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. मात्र, टेस्ला लॉन्च करण्याबाबत सरकारशी सातत्याने चर्चा सुरु आहे.

दरम्यान, बातम्या येत आहेत की, टाटांच्या नवीन इलेक्ट्रिक कार Tata Avinya मध्ये Tesla सारखे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर मिळू शकतात. त्याला ऑटोपायलट फीचर असेही म्हणतात. या फीचरच्या मदतीने गाडी ड्राइव्हरशिवाय चालवता येणार आहे. टाटा आपली Avinya इलेक्ट्रिक कार 2025 पर्यंत भारतीय बाजारात लॉन्‍च करु शकतात.

Tata Avinya
GST संकलनाने तोडले सर्व रेकॉर्ड, एप्रिलमध्ये सरकारला मिळाले 1.68 लाख कोटी

तसेच, टाटा (Tata) पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रोडक्ट लाइन आणि ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी म्हणाले की, टाटा अवन्या ज्या आर्किटेक्चरवर आधारित असेल त्याला लेव्हल 3 किंवा त्याहून अधिक ऑटोनोमस टेक्नोलॉजी लेवल सपोर्ट दिसेल. यामध्ये टेस्ला इलेक्ट्रिक कार सारखी ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्सचा बोलबाला असेल. यामुळेच टाटा मोटर्स आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारमध्येही या खास वैशिष्ट्यावर भर देऊ शकते.

ऑटोनोमस ड्राइविंग फीचर?

ऑटोनॉमस ड्रायव्हिंग किंवा ऑटोपायलट म्हणजे ड्रायव्हरच्या मदतीशिवाय कार चालवणे. हे तंत्रज्ञान अनेक वेगवेगळ्या इनपुटच्या आधारे कार्य करते. उदाहरणार्थ, ते मॅप डायरेक्ट सॅटेलाइटशी कनेक्ट होते. प्रवाशाला कुठे जायचे आहे, हा बार मॅपमध्ये सिलेक्ट केला जातो. यानंतर मार्ग निवडला जातो.

>> जेव्हा कार ऑटोपायलट मोडवर चालत असते, तेव्हा सॅटेलाइटसोबत कारच्या आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्यांमधूनही इनपुट मिळते. म्हणजेच गाडीच्या समोर किंवा मागे, उजवीकडे किंवा डावीकडे कोणतीही ऑब्जेक्ट नाही. एखादे ऑब्जेक्ट असताना कार डावीकडे-उजवीकडे सरकते किंवा थांबते.

>> कारमध्ये अनेक सेन्सर्स देखील आहेत, जे कारला रोड-लेनमध्ये ठेवण्यास आणि सिग्नल वाचण्यास मदत करतात. ऑटोपायलट मोडमध्ये कारचा वेग 112 किमी प्रतितास पर्यंत पोहोचतो. मात्र, या तंत्रात अनेक वेळा सेन्सर काम करणे थांबवतात त्यामुळे अपघात होतात.

Tata Avinya
नोव्हेंबरमध्ये GST चं बंपर कलेक्शन, सरकारच्या तिजोरीत 1.31 लाख कोटी

टेस्लाच्या ऑटोपायलट फीचरमुळे अनेक अपघात झाले

टेस्ला आधीच आपल्या कारमध्ये ऑटोपायलट फीचर देत आहे. मात्र, या फिचरमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या फीचरवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तथापि, कंपनीने प्रत्येक वेळी ऑटोपायलट फिचर हे अपघाताचे कारण नसल्याचे सांगितले आहे. कंपनी हे फिचर आणखी अत्याधुनिक बनवण्यासाठी काम करत आहे. टेस्लाच्या ऑटोपायलट फिचरमुळे झालेल्या अपघातांची दोन प्रकरणे.

केस क्रमांक 1 : ऑगस्ट 2019 मध्ये, बेंजामिन माल्डोनाडो त्याच्या 15 वर्षांच्या मुलासह, कॅलिफोर्निया फ्रीवेवरील फुटबॉल स्पर्धेतून परतत होते. रस्ता ओलांडताना त्याने फोर्ड एक्सप्लोरर पिकअपचा वेग कमी केला. माल्डोनाडोने टर्न सिग्नल दिला आणि उजवीकडे वळला. अचानक टेस्ला मॉडेल काही सेकंदात त्याच्या पिकअपला धडकली. कार ऑटोपायलट मोडवर चालवली जात होती. ज्याचा वेग ताशी 96 किमी पेक्षा जास्त होता.

Tata Avinya
Vodafone-Idea बंद झाली तर सरकारला 1.60 लाख कोटी रुपयांचा फटका

केस नंबर-2: 2019 मध्ये टेस्लाची मॉडेल एस कार अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात वेगाने जात होती. रस्त्यावर अचानक वळण आल्याने कारचे नियंत्रण सुटले आणि झाडावर आदळली. झाडाला धडकताच कारने पेट घेतला आणि कारमधील लोक बाहेर पडण्यापूर्वीच त्यांचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांनी मीडियाला सांगितले की, अपघातादरम्यान कारमधील ड्रायव्हिंग सीटवर कोणीही बसले नव्हते, एक व्यक्ती ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसली होती आणि दुसरी व्यक्ती मागे बसली होती.

टाटा Avinya मध्ये काय खास आहे?

टाटाची लक्झरी इलेक्ट्रिक कार Avinya ही ईव्ही थर्ड जनरेशन आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे. भारतासोबतच जागतिक बाजारपेठेतही लॉन्च केली जाईल. ही कार लक्ष वेधक असणार हे मात्र नक्की. हे हॅचबॅक, एमपीव्ही आणि क्रॉसओव्हर या मॉडेलमधील आहे. या कारमध्ये एक अनोखी 'T' लाइट सिग्नेचर, बटरफ्लाई डोर, समोर एक मोठा ब्लॅक पॅनेल, LED DRL आणि ब्लॅक बोनेट आहे. साइड प्रोफाईलला मोठमोठे अलॉय व्हील्स आणि कारच्या आत आणि बाहेर रुंद दरवाजे आहेत. यात अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स, सेंटर कन्सोलवर मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह खास आकाराचे स्टीयरिंग व्हील देखील आहे. याला पॅनोरॅमिक सनरुफ देखील मिळते. विशेष म्हणजे ही कार पूर्ण चार्ज करुन 500 किमी पर्यंत जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com