Twitter New CEO: ट्विटरच्या सीईओपदी येणार 'मॅडम', मस्क यांनी दिली माहिती

ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना, 'ती सहा आठवड्यात काम सुरू करेल.' अशी माहिती एलन मस्क यांनी दिली.
Twitter | Elon Musk
Twitter | Elon Musk Dainik Gomantak

Twitter New CEO: एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.

ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना, 'ती सहा आठवड्यात काम सुरू करेल.' अशी माहिती एलन मस्क यांनी दिली.

ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सापडला आहे, असे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी पायउतार होण्यापूर्वी गुरूवारी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असणार त्याचे नाव सांगितले नसले तरी ट्विटरच्या नवीन सीईओ महिला असतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, एलन मस्क यांनी या पदासाठी कॉमकास्ट एनबीसी युनिव्हर्सल कार्यकारी लिंडा याकारिनो यांच्याशी चर्चा केली आहे. अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने त्यांच्या अहवालात दिली आहे.

Twitter | Elon Musk
महागड्या बाटलीत स्वस्त दारू; फरिदाबादच्या सर्वात मोठ्या मद्यविक्रेत्याला गोव्यात अटक

'मी Twitter साठी नवीन CEO नियुक्त केले आहे हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. ती 6 आठवड्यांत काम सुरू करेल.' असे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मस्क येत्या काही आठवड्यांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्याची भूमिका स्वीकारतील. यानंतर ते ट्विटरचे सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीम चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लिंडा याकारिनो ट्विटरच्या सीईओची भूमिका स्वीकारण्यासाठी चर्चा करत आहेत. याकारिनोने भूतकाळात मस्कचे कौतुक केले आहे आणि अॅड एजन्सी इव्हेंटमध्ये त्यांच्या सामायिक हजेरीमुळे अटकळ वाढली. असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.

Twitter | Elon Musk
CBSE Board 12th And 10th Result 2023: दहावीचे 93.12 तर, बारावीचे 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, येथे पाहा तुमचा निकाल

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटरचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. सीईओ म्हणून पदासाठी नवीन व्यक्ती सापडताच एलन मस्क ते पद सोडतील असे त्यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते.

एलन मस्क यांनी याआधी 11 मे रोजी ट्विटरवर एन्क्रिप्टेड मेसेजिंग सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. “एनक्रिप्टेड डायरेक्ट मेसेजची सुरुवातीची आवृत्ती नुकतीच लॉन्च झाली आहे. एकदा वापरून पहा, परंतु अद्याप त्यावर विश्वास ठेवू नका." असे त्यांनी म्हटले होते.

युझर इमोजीसह थ्रेडमधील कोणत्याही संदेशाला थेट उत्तर देऊ शकतात. याशिवाय, चांगल्या कम्युनिकेशनसाठी, ट्विटर आगामी काळात आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सादर करणार आहे. असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com