PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यात!

अपात्र शेतकऱ्यांची केली यादी, त्यांच्या खात्यात पैसे वर्ग होणार नाहीत
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak

PM Kisan Yojana: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही यातील सर्वात पसंतीची योजना आहे. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. ही रक्कम सरकारकडून दर चौथ्या महिन्यात तीन हप्त्यांमधून वर्षभरात पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 12 हप्त्यांचा लाभ मिळाला असून शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM Kisan Yojana
Manali Silent Villages: मनालीतील 'ही' 9 गावे पुढील 42 दिवस चिडीचूप! जाणून घ्या नेमके कारण...

पीएम किसान योजनेचे पैसे केंद्र सरकारकडून 23 जानेवारी 2023 रोजी जारी केले जाऊ शकतात. 23 जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. हा दिवस सरकार शौर्य दिन म्हणून साजरा करते. त्यामुळे हा दिवस विशेष मानून पीएम मोदी 23 जानेवारीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2,000 रुपये देऊ शकतात. ज्यांचा 12 वा हप्ता रखडला आहे त्यांचेही पैसे या हफ्त्यासोबत मिळतील.

13व्या हप्त्याचे पैसे 12व्या हप्त्याप्रमाणे अडकणार नाहीत, अशी भीती अनेक शेतकर्‍यांना असते, त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी एकदा शेतकरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा ऑनलाइन कृषी पोर्टलवरून माहिती घ्यावी. यावेळी केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली असून, त्यांच्या खात्यात पैसे वर्ग होणार नाहीत.

PM Kisan Yojana
Jallikattu: तामिळनाडूत जल्लीकट्टू दरम्यान 19 जण जखमी; 800 खेळाडू होणार सहभागी

यादीत तुमचे नाव शोधा

PM किसान योजना (PM Kisan Yojana New List) ची नवीन यादी आली आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव देखील तपासू शकता. पंतप्रधान किसान योजनेच्या पोर्टलवर तुम्ही पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. फारमर कॉर्नरच्या खाली लाभार्थी यादीत जा. लाभार्थी यादीवर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. त्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव, ब्लॉक आणि गावाची माहिती द्या. सर्व माहिती भरल्यानंतर यादी दिसेल. त्यात नाव तपासता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com