PM Kisan Yojana: शेतकरी सन्मान निधीचा 13 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार

e-kyc करणे गरजेचे, जाणून घ्या हप्त्याची स्थिती तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaDainik Gomantak

PM Kisan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये वर्ग केले जातात.

योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च दरम्यान जारी केला जातो.

PM Kisan Yojana
Bike Modification: हे नियम पाळले नाहीतर तुमची बाईक जप्त होऊ शकते

हप्त्याची स्थिती कशी तपासायची?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जाऊन शेतकरी कॉर्नरमधील लाभार्थी स्थितीवर क्लिक करायचे. येथे आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकायचा. Get Data वर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती समोर येईल. यामध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती पाहू शकता.

मोबाईलवर हप्त्याची स्थिती तपासता येते. यासाठी पीएम किसान मोबाईल अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅपद्वारे तुम्ही नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करू शकता. तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. सबमिट केलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करू शकता. लाभार्थी यादीत तुमची स्थिती तपासू शकता. तुमचा व्यवहार क्रमांक तपासू शकता.

हप्ता आला नाही तर काय करायचे?

जर तुम्हाला या योजनेच्या नोंदणीमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर फार्मर कॉर्नरमधील हेल्प डेस्कवर जाऊन आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकून Get Details वर क्लिक केल्यावर एक क्वेरी फॉर्म दिसेल.

येथे ड्रॉप डाउनमध्ये खाते क्रमांक, पेमेंट, आधार आणि इतर समस्यांशी संबंधित पर्याय दिले आहेत. तुमच्या समस्येनुसार ते निवडावे आणि खाली त्याचे वर्णन लिहून सबमिट करावे.

PM Kisan Yojana
Top 10 Car Discounts: फेब्रुवारीमध्ये दहा कारवर मिळतेय 2.5 लाखांपर्यंत सूट, आजच मिळवा फायदा

e-kyc आवश्यक

शेतकऱ्यांनाही e-kyc ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जाऊन e-kyc चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर दुसरा आधार ओटीपी येईल. आधार ओटीपी टाकल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे?

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in च्या होम पेजवर शेतकरी कॉर्नरमधील लाभार्थी यादीवर क्लिक करून त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे. Get Report वर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल.

PM-KISAN योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर किसान कॉर्नरवर जाऊन 'नवीन नोंदणी' पर्यायावर क्लिक करावे. तुम्ही ग्रामीण शेतकरी आहात की शहरी शेतकरी हे निवडावे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका आणि राज्य निवडावे. 'Captcha' सत्यापित करा आणि OTP एंटर करावे. OTP पडताळणीनंतर, तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com