Ration Card New Rules: राशन कार्डसंबंधी हे नियम तुम्हाला माहितीयेत का? 'अन्यथा...'
Ration CardDainik Gomantak

Ration Card New Rules: राशन कार्डसंबंधी हे नियम तुम्हाला माहितीयेत का? 'अन्यथा...'

अन्न वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत बनविल्या जाणार्‍या राशनकार्डबाबत सरकारने काही विशेष नियम बनवले आहेत.

अन्न वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत बनविल्या जाणार्‍या राशनकार्डबाबत सरकारने काही विशेष नियम बनवले आहेत. कोणते लोक राशनकार्डसाठी पात्र आहेत आणि कोण नाहीत हे नियमात सांगण्यात आले आहे. जर अपात्र लोकांनी शिधापत्रिका (Ration Card) बनवली आणि राशन वितरणाचा फायदा घेत असतील तर सरकार त्यांच्यावर कारवाई करु शकते. दुसरीकडे, अपात्र व्यक्ती आधीच शिधापत्रिका बनवून वापरत असतील, तर त्यांनी तात्काळ परत करावी, असेही नियमात स्पष्टपणे म्हटले आहे. अन्यथा, ते कारवाईस पात्र असतील. कोरोना महामारीच्या (Coronav Epidemic) काळात जे लोक या कक्षेत येत नाहीत त्यांनीही राशनकार्ड बनवून लाभ घेण्यास सुरुवात केली असल्याच्या तक्रारी सरकारी (Government) विभागांकडे आल्या आहेत. (The government has made some special rules regarding ration cards to be issued under the Food Distribution System)

खरं तर, लॉकडाऊनमध्ये सरकारने गरीब लोकांना राशन देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु केली आणि मोफत धान्य वाटप सुरु केले. ही योजना सातत्याने पुढे वाढवली जात आहे. या योजनेतर्गंत तांदूळ, गहू, हरभरा याशिवाय इतर वस्तूही देण्यात येतात. या खाद्यपदार्थांचा लाभ घेण्यासाठी जे लोक या श्रेणीत येत नाहीत किंवा श्रीमंत वर्ग असूनही राशन घेत आहेत, त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन शिधापत्रिकाही बनवल्या आहेत. सरकारने अशा लोकांची चौकशी सुरु केली असून त्यांची यादी जारी केली जाईल.

Ration Card
मोदी सरकारची संसदेत मोठी घोषणा, Ration Card शिवाय घेता येणार रेशनचा लाभ!

अशा लोकांवर कारवाई केली जाईल

अपात्र लोकांनी शिधापत्रिका बनवली असतील तर ती परत करावी, असे सरकारने म्हटले आहे. त्यांनी कार्ड न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अटींनुसार, ज्या व्यक्तीकडे 100 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त प्लॉट, फ्लॅट किंवा घर आहे, चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर आहे, खेड्यात 2 लाख आणि शहरांमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे, अशा लोकांना राशन योजनेसाठी पात्र धरले जाते. आहेत. राशनकार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कार्ड रद्द केले जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.

Ration Card
Buy Now Pay Later की Credit Card? शॉपिंगसाठी कोणता पर्याय चांगला हे घ्या जाणून

'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा लाभ घ्या

शिधापत्रिका योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजना सुरु केली आहे. यामध्ये शिधापत्रिका देशातील कोणत्याही ठिकाणाहून प्रमाणित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही योजना देशातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जात आहे. या योजनेंतर्गत अन्न सुरक्षा योजनेत सहभागी असलेल्या 86 टक्के लोकसंख्येला लाभ मिळत आहे. कामासाठी अनेकवेळा आपल्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा नोकरदार वर्गाला होत आहे. या लोकांचे राशन थांबले नाही, त्याचा संपूर्ण फायदा 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेत दिला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.