पेट्रोल- डिझेल स्वस्त करण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल !

भारत (India), जपान आणि अमेरिका आपले तेलाचे भंडार खुले करत आहे.
पेट्रोल- डिझेल स्वस्त करण्यासाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल !
Petrol PumpDainik Gomantak

भारत (India), जपान (Japan) आणि अमेरिका (America) आपले तेलाचे भंडार खुले करत आहे. या तिन्ही देशांच्या निर्णयामुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ओपेक देशांच्या (OPEC Countries) विनंतीनंतरही तेल उत्पादक देश कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने नाहीत. त्यामुळे जगभरात तेलाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. त्याच कारणासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत, जपान आणि अमेरिकेने रणनीती आखली आहे. या रणनीती अंतर्गत, तेलाचे राखीव साठे खुले जातील आणि तेलाचा पुरवठा पुरेसा होईल. यामुळे किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, एका अहवालात असे म्हटले आहे की, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या साठ्यातून 5 दशलक्ष बॅरल कच्चे तेल काढू शकतो. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. राखीव साठ्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर 7 दिवसांत देशांतर्गत बाजारात पुरवठा सुरळीत होऊ शकतो. त्यामुळे महागड्या तेलांची किंमत कमी होण्यास मदत होणार आहे. या अहवालात भारताच्या या पावलाने उर्वरित जगालाही त्यांच्याकडील राखीव तेल काढता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तेलाचा पुरवठा वाढेल. वाढत्या पुरवठ्यामुळे तेलाच्या किमती कमी होऊ शकतात.

Petrol Pump
LIC ची जीवन अक्षय योजना, एकरकमी गुंतवा आणि मिळवा महिना 20,000 रुपयापर्यंत पेन्शन

भारत, जपान आणि अमेरिकेची तयारी

भारत, जपान आणि अमेरिकेने भागीदारीत कच्च्या साठ्यातून कच्चे तेल रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, तिन्ही देशांमधील सर्वाधिक तेलाचा साठा अमेरिकेच्या साठ्यातून रिलीज जाऊ शकतो. यामध्ये जपानने कच्च्या साठ्यातून काढलेल्या तेलाच्या वापरावर निर्बंध घालण्याचा नियम केला आहे. म्हणजेच हे कच्चे तेल कुठे, कसे वापरायचे याचे नियम जपान ठरवेल. जगाला मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करणारे ओपेक देश सध्या जागतिक बाजारपेठेत पुरवठा हळूहळू वाढवत आहेत, त्यानंतरही तेलाचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे जगभरात तेल आणि ग‌ॅस किमतीत मोठी वाढ होत आहे. भारत, जपान आणि अमेरिकेच्या या हालचालीमुळे किंमत कमी होण्यास मदत होऊ शकते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com