क्रिप्टोकरन्सीवर संपूर्ण बंदी असणे आवश्यक: RBI

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने आरबीआयला क्रिप्टोकरन्सीवरील 2018 ची बंदी मागे घेण्यास भाग पाडले होते.
Cryptocurrency

Cryptocurrency

Dainik Gomantak 

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने केंद्रीय मंडळासमोर सादरीकरणात म्हटले आहे की, क्रिप्टोकरन्सीवर संपूर्ण बंदी असणे आवश्यक आहे. आंशिक निर्बंध उपयोगाचे ठरणार नाहीत.
आरबीआय क्रिप्टोकरन्सीला मान्यता देण्याच्या विरोधात ठाम आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने आरबीआयला क्रिप्टोकरन्सीवरील 2018 ची बंदी मागे घेण्यास भाग पाडले होते.

<div class="paragraphs"><p>Cryptocurrency</p></div>
इंस्टाग्रामवरून चुकून डिलीट झालेला डेटा 'या' प्रकारे करा रिस्टोर

बोर्ड सदस्य रेवती अय्यर यांनी सावधगिरीने पुढे जाण्याची गरज व्यक्त केली व सदस्य सचिन चतुर्वेदी यांनी धोरणकर्त्यांना टोकाची पावले उचलण्यापासून आणि जागतिक स्तरावर तोडल्या जाण्याच्या जोखमीपासून सावध केले. सरकार हिवाळी अधिवेशनात Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021 बिल मांडणार आहे.

<div class="paragraphs"><p>Cryptocurrency</p></div>
अर्थसंकल्पपूर्व बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनुपस्थित

“क्रिप्टोवर खूप सखोल चर्चेची गरज आहे,” असे आरबीआय (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. मंडळाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या कामकाजाच्या विविध क्षेत्रांवरही चर्चा केली. बोर्डाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सेंट्रल बँकर्समध्ये डेप्युटी गव्हर्नर महेश कुमार जैन, मायकेल देबब्रत पात्रा, एम राजेश्वर राव आणि टी रबी शंकर यांचा समावेश होता. केंद्रीय मंडळाचे इतर संचालक सतीश के मराठे आणि एस गुरुमूर्तीही उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com