पेट्रोल-डिझेलची टंचाई भासणार नाही, सरकारचा नवा नियम लागू

आता केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल बाबत पाऊल उचलले आहे.
पेट्रोल-डिझेलची टंचाई भासणार नाही, सरकारचा नवा नियम लागू
Petrol Diesel Dainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विशेषत: खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांना तेल मिळत नसल्याच्या बातम्या येता आहेत. आता केंद्र सरकारने (Central Government) याबाबत पाऊल उचलले आहे. (There will be no shortage of petrol and diesel new government rules will apply)

Petrol Diesel
Airtel चा प्लान झाला महाग! यूजर्संना द्यावे लागणार अतिरिक्त 200 रुपये

काय आहे सरकारचा निर्णय:

पेट्रोल डिझेल खासगी पंपांची मनमानी रोखण्यासाठी सरकारने युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) ची व्याप्ती वाढवली आहे. "सरकारने आता रिमोट रिटेल आउटलेट्स (ROs) सह सर्व पेट्रोल पंपांवर USO ची व्याप्ती वाढवली," असे सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

परवाना रद्द होण्याची शक्यता:

यामध्ये ग्राहकांसाठी तेलाची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येते. याशिवाय गुणवत्ता, किंमत यासर्व गोष्टी बघून ग्राहकांच्या हिताच्या गोष्टी लक्षात घेण्यात येतात. जर नियमांचे पालन न करणाऱ्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.

मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे संचालित काही पेट्रोल पंपांवर अचानक मागणी वाढल्यामुळे स्टॉक संपल्याच्या अहवालानंतर हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com