लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग आधी ही बातमी वाचाचं

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

एचपीने आपला सर्वात स्वस्त क्रोमबुक लॅपटॉप लाँच केला असून या लॅपटॉपमध्ये टच स्क्रीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या नव्या लॅपटॉपचे  नाव एचपी क्रोमबुक 11 ए असे ठेवले आहे.

एचपीने आपला सर्वात स्वस्त क्रोमबुक लॅपटॉप लाँच केला असून या लॅपटॉपमध्ये टच स्क्रीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या नव्या लॅपटॉपचे  नाव एचपी क्रोमबुक 11 ए असे ठेवले आहे.  21,999 रुपयांपासून या क्रोमबुकची किंमत सुरू हॉट असून तो ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. 

एचपी क्रोमबुक 11 ए मध्ये 11.6-इंच एचडी टच स्क्रीन डिस्प्ले आहे.  लॅपटॉपमध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक एमटी 8183 प्रोसेसर आहे. विशेष म्हणजे या लॅपटॉपची रचना शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना लक्षात ठेवून करण्यात आली आहे. तसेच, यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा लॅपटॉप दुसरी ते सातवी या वर्गातील मुलांसाठी बनविला आला असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एचपी क्रोमबुक 11 ए  घरूनच ऑनलाईनशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे,  विद्यार्थी घरातूनच कनेक्ट होतील, प्रेरित होतील आणि सर्जनशील राहतील. 

Share Market Update : कोरोनाच्या धास्तीमुळे भांडवली बाजार कोसळला; सेन्सेक्स आणि...

एचपी क्रोमबुक 11 ए इंडिगो ब्लू रंगात मॅट फिनिशसह डिझाइन करण्यात आला आहे. यात रंग-संयोजित कीबोर्ड डेक आहे. या लॅपटॉपचे वजन केवळ 1 किलो आहे.  एचपी क्रोमबुक 11 ए मध्ये 64 जीबीची इंटरनल मेमरी आहे. मेमरी कार्डच्या मदतीने ती 256GBपर्यंत वाढवता येऊ शकते. हे गूगल वनसह येते. Google one सह 100GB सह क्लाउड मेमरी विनामूल्य उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, गूगल एक्सपर्ट चा एक वर्षाचा एक्ससेसही उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

ऑटोमॅटिक पेमेंटच्या बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय

यात मीडियाटेक इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड देखील आहे. यात ऑक्टा कोअर सीपीयू आणि जीपीयू ग्राफिक्स प्रोसेसर समाविष्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप-ए पोर्ट, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एक ऑडिओ जॅक आणि मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट आहे. हेक्रोमबुक गुगल सहाय्यकासह येते. याद्वारे गुगल प्ले स्टोअरवर 30 लाख अ‍ॅप्सवर प्रवेश करता येईल, इतकेच नव्हे यात्रा यांची  बॅटरी 16 तास चालते. असा दावाही कंपनीने केला आहे. 

संबंधित बातम्या