Best Selling Smart Phones: 'हे' आहेत भारतातले सगळ्यात जास्त विकले जाणारे स्मार्टफोन्स

Smart Phones: ग्राहक कोणत्या कंपनीच्या स्मार्टफोन्सला पसंती दर्शवत आहेत याची यादी ग्लोबल टेक्नोलॉजी मार्केट रिसर्च फर्म Counterpoint Research ने प्रसिद्ध केली आहे.
Best Selling Smart Phones
Best Selling Smart PhonesDainik Gomantak

Best Selling Smart Phones in India: ग्राहकांसाठी बाजारात सध्या वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. ग्राहक नेहमीच चांगल्या आणि नवीन तंत्रज्ञानयुक्त असलेल्या वस्तूंना प्राधान्य देत असतात. बाजारात कोणत्या कंपनीच्या वस्तूंना मागणी आहे याचा अभ्यास ग्राहक कोणत्या वस्तूंना प्राधान्य देतो यावरुन केला जातो.

आता भारता( India )त कोणते स्मार्टफोन्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ग्राहक कोणत्या कंपनीच्या स्मार्टफोन्सला पसंती दर्शवत आहेत याची यादी ग्लोबल टेक्नोलॉजी मार्केट( Market ) रिसर्च फर्म Counterpoint Research ने प्रसिद्ध केली आहे.

यामध्ये मागच्या तीन महिन्यात कोणत्या फोनची सगळ्यात जास्त विक्री केली गेली आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, Apple iPhone 13 ला ग्राहकांकडून सगळ्यात जास्त पसंती मिळाली आहे. Apple iPhone 13 चे मार्केट शेअर 4 टक्के आहे.

दुसऱ्या स्थानावर Samsung Galaxy M13 आहे. त्याचा मार्केट शेअर ३ टक्के आहे.

तिसऱ्या स्थानावर Xiaomi Redmi A1 ने बाजी मारली आहे. याचासुद्धा मार्केटमधील हिस्सा 3 टक्के आहे.

त्याचबरोबर, Samsung Galaxy A04s ने चौथे स्थान पटकावले आहे.

दरम्यान, Realme C35 पाचव्या स्थानावर आहे.

Best Selling Smart Phones
Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री करणार A,B,C,D चा उल्लेख! जाणून घ्या अर्थ

केलेल्या अभ्यासानुसार,भारतीय बाजारपेठेत Apple iPhone 13 ची पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीदरम्यान, Apple iPhone 13 वर मोठ्या प्रमाणात ऑफर देण्यात आली होती याचा फायदा कंपनीला झाल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com