Triumph ने लॉन्च केली नवी बाईक; मात्र जगातले मोजकेच लोक विकत घेऊ शकतील

Triumph ने लॉन्च केली नवी बाईक; मात्र जगातले मोजकेच लोक विकत घेऊ शकतील
Triumph launched special New Bike

प्रसिद्ध ब्रिटिश वाहन (Vehicle) निर्माता ट्रायम्फ (Triumph) कंपनीने आज आपल्या दोन प्रसिद्ध बाईक स्क्रॅम्बलर (Scrambler) 900 आणि स्क्रॅम्बलर 1200चे  स्पेशल एडिशन सॅन्डस्टॉर्म आणि स्टीव्ह मॅकक्वीन हे  भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. स्ट्रीट ट्विन गोल्ड लाइन नंतर कंपनीने भारतीय बाजारपेठेत सादर केलेल्या या दुसर्‍या विशेष एडिशन (Edition) बाईक आहेत. कंपनीने दिलेल्या माहिती नुसार स्क्रॅम्बलर 900 च्या स्पेशल एडिशन सॅन्डस्टोरमची किंमत 9.65 लाख ठेवली असून स्क्रॅम्बलर 1200 ची किंमत 13.75 लाख एवढी ठेवली आहे. (Triumph launched special edition of Scrambler bike )

कंपनीने ही गाडी खास कलर स्कीम मध्ये बाजारात आणली आहे. या गाडीच्या इंधन टाकीवर मॅट स्टॉर्म ग्रे आणि आयर्नस्टोन एक्सेंट हे रंग  उपलब्ध आहेत. तसेच या गाडीच्या समोरील बाजूला उंच मडगार्ड असून त्यामुळे ऑफरोड रायडिंगसाठी ही गाडी उत्तम अनुभव देऊ देऊ शकते. गाडीच्या हेडलाईटला संरक्षक ग्रील असून पायाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले नी पॅड सुद्धा स्टायलिश स्वरूपात देण्यात आलेले आहे. 

विशेष बाब ही आहे की कंपनी जगभरात या एडिशनच्या फक्त 775 गाड्याच विक्री करणार आहे. यामध्ये प्रत्येक गाडीला एक खास व्हीआयएन नंबर सुद्धा देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये कंपनीने 900 सीसी इंजिनचा वापर केला असून, 64 बाईक हॉर्स पॉवर आणि 80 एनएम एवढे टॉर्क जनरेट करते. तसेच या गाडीला 5 स्पीडचा गियर बॉक्स देण्यात आला आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com