Indian Railway: खुशखबर! रेल्वेच्या वेटिंग तिकीटाचा त्रास संपणार; AI देणार कन्फर्म तिकीट

रेल्वेने सुरू केली ट्रायल; प्रत्येक ट्रेनमधून वर्षाला एक कोटीहून अधिक महसुलाची अपेक्षा
Indian Railways
Indian RailwaysDainik Gomantak

Indian Railway: एखाद्या लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचे तिकीट बुक करताना बऱ्याचदा कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः सणासुदीच्या काळात तर हा त्रास आणखी वाढतो. तथापि, रेल्वे तिकिटांच्या वेटिंगची समस्या आता सुटेल असे दिसते आहे. कारण ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

Indian Railways
Adani Group vs Hindenburg: अखेर हिंडनबर्ग रिसर्चच्या प्रश्नांना अदानी ग्रुपने दिली उत्तरे

तिकिट कन्फर्म करण्यासाठी रेल्वे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेणार आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळण्यासह गाड्यांची वाट पाहण्याच्या त्रासातूनही प्रवाशांची सुटका होणार आहे.

वेटिंग पिरियड कमी होणार

वास्तविक, भारतीय रेल्वेने असा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रोग्राम तयार केला आहे. या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्रॅमच्या मदतीने रेल्वे तिकीट आपोआप कन्फर्म होईल. यामुळे गाड्यांमधील वेटिंग पिरियडमध्ये सुमारे 5 ते 6 टक्क्यांनी घट होईल, असे सांगण्यात येत आहे.

रेल्वेकडून या तंत्रज्ञानाची ट्रायल घेतली जात आहे. यात रेल्वेला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. या तंत्रज्ञानाचे काय फायदे होतील ते जाणून घेऊया.

चाचणीला यश

कन्फर्म तिकिटांच्या समस्येला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वेने इन-हाउस आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम तयार केला आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या सॉफ्टवेअर शाखेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) ची मदत घेतली जाणार आहे.

चाचणी दरम्यान, या कार्यक्रमात राजधानी एक्स्प्रेससह सुमारे 200 गाड्यांचा तपशील देण्यात आला होता. यानंतर ही यंत्रणा जागांच्या मागणीचे व्यवस्थापन कसे करते हे तपासण्यात आले. या चाचणीत रेल्वेला यश मिळाले असून बहुतांश वेटिंग तिकीट कन्फर्म झाल्याचे दिसून आले.

Indian Railways
Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर...

चाचणीचा अभ्यास सुरू

सध्या रेल्वे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रामद्वारे अभ्यास करत आहे, वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यासाठी चाचणी दरम्यान वेगवेगळ्या प्रकारे चाचणी केली गेली. यामध्ये ट्रेनमधील प्रवाशांचे तिकीट बुक करण्याचा पॅटर्न पाहिला गेला. तसेच कोणत्या स्थानकांसाठी जास्तीत जास्त तिकिटे बुक केली गेली याचाही अभ्यास झाला.

याशिवाय, वर्षातून कोणत्या वेळी कोणत्या स्थानकांसाठी तिकिटांची सर्वाधिक मागणी होती, हेही निश्चित करण्यात आले. मात्र, या तंत्रज्ञानावर रेल्वेचा अभ्यास सुरू आहे. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर रेल्वे हा उपक्रम राबविण्याचा विचार करेल.

महसूल वाढणार

या तंत्रज्ञानामुळे रेल्वेला कोट्यवधींचा फायदा होणार आहे. रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतीक्षा यादी कमी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे पूर्वीपेक्षा जास्त तिकीट कन्फर्म होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यास रेल्वेच्या महसुलात कोट्यवधी रुपयांची वाढ होईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वेला प्रत्येक ट्रेनमधून वर्षाला एक कोटी रुपयांचा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com