Uber New Feature: WhatsApp वर करा Uberचे कॅब, बाईक, ऑटो बुकींग

Uber आता भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर येत आहे.
Uber New Feature
Uber New FeatureDainik Gomantak

Uber आता भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर येत आहे. या कॅब एग्रीगेटरने व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक करण्याचा नवीन उपाय आणला आहे. Uber ची नवीन कॅब-बुकिंग सेवा या आठवड्याच्या सुरुवातीलाच सुरू होणार आहे. (Uber New Feature Book Uber cabs bikes autos on WhatsApp)

Uber New Feature
Loan on PAN Card: पॅन कार्डवर किती वैयक्तिक कर्ज मिळणार, त्याच्या अटी काय आहेत?

सुरुवातीला ही सेवा फक्त दिल्ली एनसीआर भागात उपलब्ध असणार आहे. त्यानंतर इतर भागातही त्याचा विस्तार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. डिसेंबर 2021 मध्ये लखनौ प्रदेशात या सुविधेची पहिल्यांदा टेस्ट करण्यात आली.

इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये मिळणार सर्विस,

कंपनी दिल्ली एनसीआरच्या लोकांना व्हॉट्सअॅपवर अधिकृत चॅटबॉटद्वारे उबेर राइड्स बुक करण्याचा पर्याय देत आहे. वापरकर्ता नोंदणीपासून, राइड्सचे बुकिंग आणि प्रवासाच्या पावत्या प्राप्त करण्यापासून, सर्व काही WhatsApp चॅट इंटरफेसमध्ये मॅनेज केले जाणार आहे. उबरची ही सेवा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे.

3 स्टेप्समध्ये बुक करा

- सर्वप्रथम Whatsapp वर +91 7292000002 वर 'Hi' पाठवा.

त्यानंतर तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप ऑफ लोकेशन देण्यास सांगितले जाईल.

- त्यानंतर वापरकर्त्यांना भाड्याची माहिती आणि ड्रायव्हरच्या येण्याची वेळ मिळेल.

Uber New Feature
PM Kisan Yojana: 'या' शेतकऱ्यांना पुढच्या हप्त्यात 2 हजारांऐवजी 4 हजार मिळणार? वाचा

Uber सर्व फीचर

Uber दावा करते की रायडर्सना समान सुरक्षा वैशिष्ट्ये आणि विमा संरक्षण मिळतील जे Uber अॅपद्वारे थेट ट्रिप बुक करू शकतात. बुकिंग केल्यावर त्यांना ड्रायव्हरचे नाव आणि ड्रायव्हरच्या लायसन्स प्लेटची माहिती दिली जाणार आहे. पिकअप पॉईंटकडे जाताना ड्रायव्हरचे लोकेशनही ते ट्रॅक करू शकणार आहेत. तसेच, ड्रायव्हरला ते कॉल करू शकतात आणि ड्रायव्हरला तो नंबर दिसणार नाही.

व्हॉट्सअॅप चॅट हे सेफ्टी फीचर

रायडरला सेफ्टी गाइडलाइन्सचीही माहिती देईल तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत उबेरपर्यं कसे पोहोचायचे हे देखील ते सांगणार आहे. तसेच त्यावेळी तुम्ही (हेल्प ऑन ट्रिप) असे टाईप करा. वापरकर्त्याने ट्रिप दरम्यान "आणीबाणी" पर्याय निवडल्यास, त्यांना Uber च्या ग्राहक समर्थन कार्यसंघाकडून इनबाउंड कॉल प्राप्त होईल. ट्रिप संपल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत, Uber रायडर्सना गरज असल्यास कॉल करण्यासाठी सुरक्षा लाइन नंबर देखील असणार आहे.

ही सेवा नवीन आणि जुन्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी फोन नंबरसह Uber मध्ये नोंदणी केली आहे. उबेरचा दावा आहे की त्याच्या आगामी नवीन प्रकल्पामुळे Uber अॅपच्या जुन्या वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे ट्रिप बुक करण्याची परवानगी मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com