Union Budget 2021: यंदाच्या बजेटमधील 5 महत्वाचे निर्णय

Union Budget 2021 5 important decision in budget 2021
Union Budget 2021 5 important decision in budget 2021

नवी दिल्ली union budget 2021: कोरोनाच्या संसर्गाच्या संकटानंतरचा मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी आणि या दशकातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प आधीच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा आणि देशाच्या उत्पन्नवाढीला चालना देणारा असेल, असे म्हटले होते. लॉकडाउन काळात जे पॅकेजरुपी चार-पाच छोटेखानी अर्थसंकल्प जाहीर केले होते, त्याच मालिकेतील हिस्सा म्हणून यंदाचा अर्थसंकल्प होता.. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात पहिल्याच दिवशी सरकारने मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालाने आगामी आर्थिक वर्षात (2020-2021) जीडीपी 11 टक्क्यांपर्यंत वाढेल, असे गुलाबी चित्र रंगविले असले तरी सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी सरकारला खर्च करण्याच्या कानपिचक्याही दिल्या आहेत. परंतु, सरकारची आटलेली तिजोरी पाहता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खर्च कसा करायचा याची चिंता सरकारपुढे आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बजेट सादर केले आहे. 2021-22 च्या या आर्थिक वर्षातील बजेटला 'आर्थिक वॅक्सिन' असेही म्हटले जात आहे. कोरोना आजाराच्या काळात सादर करण्यात आलेल्या बजेटकडे सरंपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्यांदा हे बजेट सादर केले आहे.  कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेणार असा विश्वास अर्थमंत्रयांनी व्यक्त केला. बजेटचे उत्तमप्रकारे सादरीकरण करण्यात आले. या 2021-22 च्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसोबत, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार, व्यापारी, आणि करदाते यांच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते निर्णय खालीलप्रमाणे.

1] आत्मनिर्भर भारत योजना

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत अनेक सुधारणांना वाव असल्याचे म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर पॅकज जीडीपीच्या 13 टक्के असल्याचे म्हटले आहे. हे एक प्रकारचे मिनीबजेट असल्याचे त्यांनी सांगितले. 

रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींची मोठी तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचे लक्ष्य डोळ्यासमोर असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.  शहरी स्वच्छ भारत अभियानासाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद. एकट्याची कंपनी सुरू करता येणार असल्याची मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली. विमा क्षेत्रातील विदेशी गु्ंतवणूक 49 वरून 74 टक्क्यांवर आणणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले आहे.

2] शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

शेतकऱ्यांसाठी यावर्षीच्या बजेटमध्ये काय मोठी घोषणा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात मांडण्यात आला. आहे. आता शेतक-यांना जी रक्कम दिली जाते त्यात वाढ होऊन ती दर महिना 10 हजार रुपये एवढी करण्यात येणार आहे. शेतमालाल दिडपट हमी भाव देण्याचे सरकारचे धोरण आहे. यंदा शेतीसाठी 16.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे उद्दीष्ट सरकारने जाहीर केले आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी  1.72 लाख कोटी जाहीर केला असून 1 हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रेनेशी जोडणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर आणखी शंभर भाजी मंडई उभारण्याचा विचार असल्याचे सरकारने  म्हटले आहे. फळ उत्पादन आणि त्यावर आधारित उद्योगाला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशभरात शेतमालाची एमएसपीवर खरेदी सुरु राहणार असल्याचे त्याचबरोबर आमच्या सरकारने एमएसपी दीडपड वाढवल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

3] आरोग्य

निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर स्वास्थ्य योजनेमुळे देशातील प्राथमिक, माध्यमिक व तृतीयक क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेअंतर्गत, 17,000 हून अधिक ग्रामीण भागातील आणि 11,000 शहरी भागातील स्वास्थ्य केंद्रांना मदत होणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी यावेळेस दिली. आरोग्य क्षेत्रासाठी 23 हजार कोटींची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. कोविड लशीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी  आपल्याकडे 2 लशी उपलब्ध आहेत. भारत 100 हून अधिक देशांत लशींची निर्यात करत आहे.

4] ट्रान्सपोर्ट

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढील आथिर्क वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना जुन्या आणि नादुरुस्त वाहनांसाठीची स्वैच्छिक वाहन स्क्रॅपिंग धोरण योजना जाहीर केली आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी 18 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या धोरणानुसार वैयक्तिक वाहनांची 20 वर्षानंतर आणि कमर्शियल वाहनांची 15 वर्षानंतर ऑटोमेटेड केंद्रांमध्ये फिटनेस टेस्ट घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  मार्च 2022 पर्यंत 8 हजार 500 किलोमीटर हायवे देशात उभारणार त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 675 किलोमीटर हायवे तयार करण्याला या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. त्यासाठी 2 हजार 217 कोटी रुपये देण्यात आल्याचे अर्थमंत्री यांनी सांगितले. या बजेटमध्ये महाराष्ट्रातील मेट्रोसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.  त्याचबरोबर रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटी रूपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.

5] लघू उदयोगांसाठी 15 हजार 700 कोटी रूपयांची तरतूद

सरकारने गोरगरीब माणसापर्यंत मदत पोहचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यामध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजना, तीन आत्मनिर्भर भारत पॅकेजेस आणि त्यासोबतच इतर लहान मिनी बजेट्सची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना काळात तीन आठवड्यांच्या संपूर्ण लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु करण्यात आली होती. 800 दशलक्ष लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा कोरोना काळात करण्यात आला होता. त्याबरोबरच  80 दशलक्ष लोकांना मोफत गॅस देण्यात आला असे निर्मला सीतारामन बजेट सादर करतांना बोलत होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com