Union Budget 2021: जास्त पगार असणाऱ्या नौकरदारांना झटका

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. काही क्षेत्राला दिलासादायक तर काहींना हा अर्थसंकल्प धक्कादायक होता. ज्यांना जास्त वेतन आहे, त्याचा पीएफ पण जास्त असतो.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. काही क्षेत्राला दिलासादायक तर काहींना हा अर्थसंकल्प धक्कादायक होता. ज्यांना जास्त वेतन आहे, त्याचा पीएफ पण जास्त असतो. या अर्थसंकल्पात मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर व्याज आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. 1 एप्रिल 2021 पासुन हे व्याज आकारले जातील.

कर्मचार्‍यांच्या वार्षिक पीएफ योगदानाच्या अडीच लाखाहून अधिक रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाणार आहे. कर्मचार्‍यांचे वर्षभरासाठी पीएफचे योगदान 3 लाख रुपये असेल तर 50 हजार रुपयांच्या अतिरिक्त पीएफ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर हा कर आकारला जाणार आहे.

आता पीएफच्या रकमेवर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. पण हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांच्या पीएफवर कर आकारण्यात येणार आहे या आधीही सरकारने 2016 च्या अर्थसंकल्पात पीएफवर ६० टक्के कर  आकारण्याचा प्रस्ताव प्रथमच केला होता, परंतु आंदोलन आणि विरोध पाहुन हा निर्णय मागे घेण्यात आला. आजचा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला थोडासा दीलासा देणारा आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे चालू असलेल्या आंदोलनाला मध्यंतरी धरुन शेतीसाठी काही महत्वाचे निर्णय या अर्थसंकल्पात घेतले आहेत.

अक्कड़ बक्कड़ बम्बे बो; पेट्रोल के दाम अब पुरे 100 -

संबंधित बातम्या