Union Budget 2021: जेष्ठ नागरिकांना पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आता रिटर्न भरावा लागणार नाही.

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

75  वर्षांवरील  नागरिकांना  पेन्शनमधून  मिळणाऱ्या  उत्पन्नवर आता  रिटर्नमधून मुक्तता  मिळणार  आहे. अर्थमंत्री  सीतारामन  यांनी  जेष्ठांना  दिलासा  देणारी   घोषणा  केली  आहे. 

Buget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प  मांडला. यात  75  वर्षांवरील  नागरिकांना  पेन्शनमधून  मिळणाऱ्या  उत्पन्नवर आता  रिटर्नमधून मुक्तता  मिळणार  आहे. अर्थमंत्री  सीतारामन  यांनी  जेष्ठांना  दिलासा  देणारी  मोठी   घोषणा  केली  आहे. 

दरम्यान  सीतारामन  म्हणाल्या, '' देशाच्या  स्वातंत्र्याच्या  75  व्य़ा वर्षात जेष्ठांना  नमन करत  त्यांच्यासाठी  मी  मोठी  घोषणा  केली  आहे.   75  वर्ष  आणि  त्यापेक्षा  जास्त  वय असणाऱ्या  जेष्ठ  नागरिकांना  केवळ  पेन्शन  आणि  त्यावरील  व्याजातून  ज्यांना  उत्पन्न मिळते  त्यांना  आता   पेन्शन  मधून  मिळणाऱ्या  उत्पन्नावर  रिटर्न  न  भरण्याचा  प्रस्ताव  मांड़त  आहे.''  तसेच  ज्यांचा  कर  काही  कारणाने  थकला  आहे, अशांना  पुन्हा  नव्याने  रिटर्न  भरण्यासाठी   6  वर्षे  जुन्या  आणि   गंभीर  प्रकरणामंध्ये  दहा  वर्षापूर्वीची  खातेवाही  सतत  काढावी  लागते.  ही गुतांगुत  कमी  करण्यासाठी   कालावधीच्या  मर्यादेत  बदल  करत  सहा  वर्षाचा  कालावधी  आता  तीन   वर्षावर आणण्यात आला  आहे.

Union Budget2021-22 : आरोग्यासाठी निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या आत्मनिर्भर...

करांशी  संदर्भातील  प्रकरणे  पूर्णपणे  संपवण्यासाठी   'विवाद  से  विश्वास'  ही योजना  सध्या  सुरु आहे. या  योजनेतून  एक  लाखाहूंन  अधिक  करदात्यांनी  या  योजनेचा  लाभ  मिळत  आहे. आणि   या योजनेद्वारे  ही  प्रकरणे  संपवण्यात आली आहेत. असही  अर्थमंत्री  निर्मला  सीतारामन  यांनी  म्हटले आहे.. 

संबंधित बातम्या