Union Budget 2023: अमृतकालचा पहिला अर्थसंकल्प, 'भारतीय अर्थव्यवस्था चमकणारा तारा...'

Union Finance Minister Nirmala Sitharaman: जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला चमकणारा तारा म्हणून ओळखले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.'
Union Finance Minister Nirmala Sitharaman
Union Finance Minister Nirmala SitharamanTwitter/ @ani_digital

Union Budget 2023: मागील काही दिवसांपासून ज्या अर्थसंकल्पाची लोक आतुरतेने वाट पाहत होते, त्याची मांडणी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन करत आहेत.

अर्थसंकल्पीय भाषणाचे उद्घाटन करताना सीतारामन म्हणाल्या की, 'अमृतकालचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला चमकणारा तारा म्हणून ओळखले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.'

सीतारामन पुढे म्हणाल्या की, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत (India) बनला आहे. भारत आज जगात चमकत आहे. यामागे भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरिबांना मोफत राशन देत आहोत.'

Union Finance Minister Nirmala Sitharaman
Budget 2023 : एका अर्थमंत्र्यांनी एकही अर्थसंकल्प सादर केला नाही... तर दुसऱ्यांच्या नावावर सर्वाधिक वेळा बजेटचा विक्रम...

दरडोई उत्पन्न दुप्पट

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7% असण्याचा अंदाज आहे, जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे.

त्या पुढे असेही म्हणाल्या की, 2014 पासून सरकारच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांचे जीवनमान सुनिश्चित झाले आहे. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून 1.97 लाख रुपये झाले आहे. या 9 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे.

Union Finance Minister Nirmala Sitharaman
Union Budget 2023: काही तासातच अर्थसंकल्प सादर होणार; वाचा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक

गरिबांसाठी मोफत अन्नधान्य योजना एक वर्षासाठी वाढवली

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार (Central Government) 2 लाख कोटी रुपयांचा भार उचलत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com