वस्त्रोद्योगासाठी 10683 कोटी रुपयांचं पॅकेज, मंत्रिमंडळाची घोषणा

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी (Textile Industry) PLI योजनेला मंजुरी दिली आहे.
वस्त्रोद्योगासाठी 10683 कोटी रुपयांचं पॅकेज, मंत्रिमंडळाची घोषणा
Union Cabinet has approved package 10683cr rupees for Textile Industry Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक झाली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली असून या बैठकीत झालेला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे सरकारने वस्त्रोद्योगासाठी आणलेली PLI योजना.(Union Cabinet has approved package 10683cr rupees for Textiles Industry)

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी (Textile Industry) PLI योजनेला मंजुरी दिली आहे. 10 वेगवेगळ्या उत्पादनांसाठी 10683 कोटी रुपयांचे पॅकेज पुढील 5 वर्षांसाठी मोदी सरकारने जाहीर केले आहे. पॅकेजमध्ये टियर 2-3 क्षेत्रातील कंपन्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योग क्षेत्रात घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो लोकांना थेट रोजगार मिळेल. पॅकेज दोन भागांमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये 100 कोटी रुपयांपर्यंत उत्पादन आणि 300 कोटी रुपयांपर्यंत उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पॅकेजमधून निर्यात वाढवण्यावर देखील भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मते, या योजनेचा मुख्यत्वे गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा सारख्या राज्यांना फायदा होईल. पियुष गोयल यांचे म्हणणे आहे की, बिहार सारखी राज्येही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Union Cabinet has approved package 10683cr rupees for Textile Industry
Telecom Sector साठी मोदी सरकार मोठी घोषणा करणार?

अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्रालयाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 5 वर्षात 10,683 कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. 7.5 लाखांहून अधिक लोकांना थेट रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील.

तसेच आज पार पडलेल्या या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंतचा सर्वाधिक आणि लाभदायक भाव 290 रुपये/क्विंटल मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com