वेदांताकडून सॅनिटायझर्सचे वितरण

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

वेदांता सेसा गोवा यांनी नुकतीच गोवा राज्यातील उपजिल्हाधिकारी, पोलिस ठाणे, कृषी कार्यालये, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या कार्यालयांना ४०० लिटर सॅनिटायझर्स प्रदान केले.

पणजी

वेदान्ता सेझा गोवा कंपनीने सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून डिचोली व परिसरातील सरकारी कार्यालयांत सॅनिटायझर्सचे वाटप केले. ही मोहिम यापुढेही कंपनीकडून सुरु ठेवण्यात येणार आहे. 
कंपनीने पत्रकात म्हटले आहे, की कोविड -१९ मुळे संक्रमित लोकांची संख्या सतत वाढत असल्याकारणाने भारतासाठी तसेच संपूर्ण जगासाठी अभूतपूर्व आव्हाने निर्माण झाली आहेत. वेदांताच्या काळजी आणि समाज कल्याण या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने वेदांता सेसा गोवा यांनी नुकतीच गोवा राज्यातील उपजिल्हाधिकारी, पोलिस ठाणे, कृषी कार्यालये, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांच्या कार्यालयांना ४०० लिटर सॅनिटायझर्स प्रदान केले.
त्यांचे निःस्वार्थ काम अभादित चालू रहावे व या शूर कोविड योद्धांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता कमी करणे हाच हेतू आहे. या व्यतिरिक्त वेदांता सेसा गोवाने गोव्यातील प्रमुख भागधारकांना ट्रिपल लेयर मास्क वितरीत केले आहेत. या कठीण काळात महिलांसाठी उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना मास्क बनवण्याचे काम देण्यात आलेले आहे.
वेदांता सेसा गोवा सर्व संभाव्य माध्यमांद्वारे आजूबाजूच्या सर्व समुदायांची सुरक्षा
सुनिश्चित करण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. वेदांता राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने काम करीत आहे जेणेकरून कोविड -१९ वर आपण विजय मिळवू. आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वेदांता सेसा गोवा पोलिस दल, अग्निशमन सेवा आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना शक्य ती मदत करत आहे. वेदांता सेसा गोवा ने कोविड -१९ चा मुकाबला करण्यासाठी अनेक संस्थांना मदत केली आहे आणि या कोविड १९ पासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्य मार्गाने कार्य सुरू ठेवले आहे,अशी माहिती कंपनीने दिली आहे.

संबंधित बातम्या