व्हिस्टा इक्विटीची जिओमध्ये  11367 कोटींची गुंतवणूक

investment
investment

मुंबई

व्हिस्टा इक्विटी पार्टनर जियो प्लॅटफॉर्ममधील 2.32 टक्के भागीदारीसाठी 11367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गेल्या तीन आठवड्यांत जिओ प्लॅटफॉर्ममधील ही तिसरी मोठी गुंतवणूक आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य अंदाजे 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपये झाले आहे. जिओ प्लॅटफॉर्ममधील या गुंतवणूकीनंतर व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स; रिलायन्स आणि फेसबुकनंतर सर्वात मोठा गुंतवणूकदार बनला आहे. जिओ प्लॅटफॉर्मने तंत्रज्ञानातील आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून 60,596.37 कोटी रुपये जमा केले आहेत.

व्हिस्टाची गुंतवणूक एप्रिलमध्ये फेसबुक गुंतवणूकीच्या 12.5 टक्के प्रीमियमवर आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जिओने सिल्व्हर लेकमध्ये गुंतवणूक केली. ती गुंतवणूकही फेसबुक डीलच्या प्रीमियमवर होती.

व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स ही एक अमेरिकन गुंतवणूक फर्म आहे जी केवळ तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येच गुंतवणूक करते. व्हिस्टा ही जगातील 5 वी सर्वात मोठी एंटरप्राइझ सॉफ्टवेअर कंपनी आहे. ज्याची एकत्रित भांडवल प्रतिबद्धता 57 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कंपनीकडे एंटरप्राइझ सॉफ्टवेअर गुंतवणूकीचा 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. व्हिस्टा पोर्टफोलिओचे 13,000 कर्मचारी कार्यरत आहेत.

विस्टाच्या गुंतवणूकीवर भाष्य करताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “ जगातील सर्वात  मोठ्या तंत्रज्ञान गुंतवणूकदारांपैकी एक महत्वाचा भागीदार म्हणून व्हिस्टाचे स्वागत करताना मला  आनंद होत आहे. आमच्या इतर भागीदारांप्रमाणेच व्हिस्टा ची दूरदृष्टी सामायिक आहे. सर्व भारतीयांच्या हितासाठी भारतीय डिजिटल इको सिस्टीम विकसित आणि कायापालट करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. ते मानतात की तंत्रज्ञानाची परिवर्तनीय शक्ती ही सर्वांच्या चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. गुजराती कुटुंबातील रॉबर्ट आणि ब्रायन हे मी पाहिलेले दोन उत्तम जागतिक तंत्रज्ञान नेते आहेत. ज्यांना भारत आणि त्याच्या डिजिटल भारतीय समाजाच्या संभाव्यतेवर विश्वास आहे. आम्ही जिओ मध्ये व्हिस्टाच्या व्यावसायिक कौशल्य आणि बहु-स्तरीय समर्थनासाठी उत्साहित आहोत. "

व्हिस्टाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट एफ. स्मिथ  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘जिओ भारतासाठी बनवित असलेल्या डिजिटल सोसायटीच्या संभाव्यतेवर आमचा विश्वास आहे. जागतिक नेता असलेल्या मुकेश यांच्या दूरदृष्टीमुळेच डेटा क्रांतीला चालना मिळाली आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर सामील झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com