आयफोन-12 ची प्रतीक्षा वाढणार

अवित बगळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कारण अस्पष्ट; सप्टेंबरमध्ये लॉंचिंग अशक्‍य

क्‍यूपरटिनो

जगातील प्रसिद्ध मोबाईल कंपनी ऍपलने आयफोन -12 सिरीजला काही काळ विलंब होणार असल्याचे सूतोवाच शुक्रवारी केले आहेत. मात्र या विलंबाचे नेमके कारण त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे दरवर्षी सप्टेंबरमध्ये येणाऱ्या आयफोनच्या नव्या म्हणजे आयफोन 12 ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी लुसा मेस्ट्री यांनी सांगितले की एप्रिल ते जून या तिमाहीत उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. ऍपल कंपनी दरवर्षी सप्टेंबरला नवीन आयफोन उपलब्ध करून देते. या वर्षी आयफोन-12 ची सिरीज येणार आहे. यात आयफोन -12, आयफोन -12 प्रो, आयफोन -12 प्रो मॅक्‍सचा समावेश असणार आहे. तसेच या आयफोनमध्ये 5 जी सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच आयफोन-11 पेक्षा या फोनमध्ये अनेक नवीन फिचर असणार आहेत. तसेच हार्डवेअर बदलही असतील. मात्र तो सप्टेंबरमध्ये येण्याची शक्‍यता कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
मात्र लुसा मेस्ट्री यांनी आयफोन-12 च्या विलंबाबाबत कोणतेही नेमके कारण सांगितलेले नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयफोन-11 लॉंच झाला होता. मात्र या वर्षी आयफोन-12 ला विलंब होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या पूर्वी आयफोन एक्‍स, आयफोन एक्‍सआरच्या लॉंचिंग वेळीही विलंब झाला होता.

 

संबंधित बातम्या